इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – अभिनेता सलमान खानसोबत दबंग ३ चित्रपटात दिसलेली टीव्ही आणि बॉलिवूड अभिनेत्री तुनिषा शर्माने ख्रिसमसच्या एक दिवस आधी टीव्हीच्या सेटवर आत्महत्या केली. पोलिसांनी तिच्या मृत्यूला दुजोरा दिला आहे. तिचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.
मेकअप रूममध्ये आत्महत्या
अभिनेत्री तुनिषा शर्माने शोमधील तिचा सहकलाकार शीजान मोहम्मद खानच्या मेकअप रूममध्ये आत्महत्या केली आहे. तुनिषा शर्मा ही टेलिव्हिजन आणि बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री होती. सध्या ती अलीबाबा दास्ताने कुबूल या टीव्ही शोमध्ये काम करत होती. या शोमध्ये शीझान मोहम्मद खान अलीबाबाची भूमिका साकारत आहे. अभिनेत्रीने हे पाऊल का उचलले हे अद्याप समजू शकलेले नाही, परंतु पोलीस या दिशेने कसून चौकशी करत आहेत.
यांच्या सोबत अफेअर
तुनिषा शर्मा आणि शीझान मोहम्मद खान यांच्यातील बॉन्डिंग खूप चांगले असल्याचे बोलले जात आहे. त्यांच्या अफेअरच्या बातम्याही व्हायरल होत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून तुनिशा खूपच नाराज होती आणि यामागचे कारण त्यांच्या नात्यातील कटुता हे देखील सांगितले जात आहे. दोघांमध्ये काय प्रॉब्लेम होता, याबाबतची माहिती अद्याप मिळालेली नाही.
कोण आहे शीझान
शीझान मोहम्मद खान एक टेलिव्हिजन अभिनेता आहे. जोधा अकबर या शोमध्ये त्याने अकबरची भूमिका साकारली होती. आता तो अलीबाबा दास्ताने कुबूल या टीव्ही शो मध्ये अलीबाबाची भूमिका साकारत आहे. तो फलक नाझचा धाकटा भाऊ आहे. सोशल मीडियावर शीझान आणि तुनिषा या दोघांचे अनेक फोटो आहेत. यातूनही दोघांची केमिस्ट्री दिसून येते. आता तपासात पोलिस त्यांच्या नात्यावर लक्ष ठेवू शकतात.
Actress Tunisha Sharma Suicide on Shooting Set