India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

चिमुकल्यांची नृत्य अदाकारी… फॅशन शो… मराठी अभिनेत्यांची भन्नाट कॉमेडी… खान्देश महोत्सवात जोरदार रंगत

India Darpan by India Darpan
December 24, 2022
in साहित्य व संस्कृती
0

 

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आमदार सीमा महेश हिरे आयोजित खानदेश महोत्सवाचा तिसरा दिवस शालेय विद्यार्थ्यांच्या विविध कला गुणांच्या प्रदर्शनाने जल्लोषात साजरा झाला. सायंकाळी सिनेमा व टीव्ही कलाकारांच्या धमाल विनोदी प्रहसनांच्या सादरीकरणाने, मराठी सिनेसृष्टीतील आघाडीच्या नायिकांच्या नृत्य अदाकारीने आणि फॅशन शो ने उपस्थितांचे यथेच्छ मनोरंजन केले.

आमदार सौ सीमा महेश हिरे यांनी दिनांक 22 डिसेंबर पासून आयोजित केलेल्या खानदेश महोत्सवाचा तिसरा दिवस विविध मनोरंजनाच्या कार्यक्रमाने पार पडला. यामध्ये दुपारच्या सत्रात शहर व जिल्ह्यातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक व समूह नृत्य स्पर्धांचा समावेश होता. या स्पर्धेमध्ये वैयक्तिक गटात 30 स्पर्धकांनी तर समूह नृत्य गटात २८ शाळांच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यातून समूह नृत्य प्रकारात त्र्यंबकेश्वर येथील कस्तुरबा गांधी बालिका आश्रमच्या विद्यार्थिनींनी सादर केलेल्या विठ्ठल रुक्माई या गाण्यावरील नृत्याला प्रथम क्रमांक देण्यात आला. गुरुगोविंद सिंग इंग्लिश मीडियम स्कूलच्या भांगडा नृत्याला द्वितीय क्रमांक, तर सागर डान्स अकॅडमीच्या गोंधळ आणि भाऊ मना सम्राट या गाण्यावरील नृत्याला तृतीय क्रमांकाचे बक्षीस मिळाले.

शालिनीताई बोरसे विद्यालयाला उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले. वैयक्तिक गटात अक्षदा देशमुख हिने सादर केलेल्या पिकल्या पानावर गीतावरील नृत्याला प्रथम, कावेरी मोराडे हिला द्वितीय, सानवी पगार ह्या लहान बालिकेने सादर केलेल्या चंद्रा गाण्यावरील नृत्याला तृतीय, तर ऋषिकेश देशमुख या विद्यार्थ्याला उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आले. या सर्व विजेत्या शाळा व विद्यार्थ्यांना आमदार सीमा हिरे, स्वामी समर्थ गुरुपीठाचे माऊली अण्णासाहेब मोरे, इस्पॅलियर स्कूलचे संचालक सचिन जोशी, मराठा मुद्रा फाउंडेशनच्या प्रतिभा होळकर, व्यापारी आघाडीचे निखिल पवार, भाजपचे नेते माहेश हिरे, रश्मी हिरे बेंडाळे यांच्या हस्ते बक्षिसे देऊन गौरव करण्यात आला. यावेळी ओमकार दळवी आणि आदिती पानसे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. सहभागी विद्यार्थी व शिक्षकांना आयोजकांच्या वतीने खाऊ वाटपही करण्यात आले.

सायंकाळी मराठी सिनेसृष्टीतील विनोदी अभिनेते भारत गणेशपुरे, योगेश शिरसाठ आणि हेमांगी कवी यांच्या विनोदी प्रहसणाच्या सादरीकरणाने उपस्थितांचे हसून लोटपोट होईस्तोवर मनोरंजन केले. त्यानंतर प्रसिद्ध नृत्यांगना मानसी नाईक आणि सुवर्णा काळे यांच्या अदाकारी संपन्न नृत्य कलेने उपस्थितांची मने जिंकली. यानंतर इंडो वेस्टर्न फॅशन शो पार पडला. या सर्व कार्यक्रमांना उत्तर महाराष्ट्र आणि नाशिक शहर जिल्ह्यातून प्रचंड मोठ्या संख्येने रसिक श्रोत्यांची उपस्थिती होती. खानदेश महोत्सवाचा आजचा शेवटचा दिवस असून आंतरराष्ट्रीय ख्यातीचे गायक शंकर महादेवन यांच्या मैफलीने आणि खानदेश रत्न पुरस्कार वितरणाने या महोत्सवाचा समारोप होणार आहे. या मैफलीचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक आमदार सीमा हिरे व रश्मी हिरे बेंडाळे यांनी केले आहे.

Nashik Khandesh Festival Different Cultural Program


Previous Post

पदवीधर मतदारसंघाची आचारसंहिता लवकरच लागणार; मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे सूतोवाच

Next Post

अभिनेत्री तुनिषा शर्माची शुटींगवेळी आत्महत्या; सहकलाकाराच्या मेकअप रुममध्ये घेतला गळफास

Next Post

अभिनेत्री तुनिषा शर्माची शुटींगवेळी आत्महत्या; सहकलाकाराच्या मेकअप रुममध्ये घेतला गळफास

ताज्या बातम्या

इंडिया दर्पण – विचार धन – वाचा आणि नक्की विचार करा

March 22, 2023

अभिनेता दीपक तिजोरीची तब्बल अडीच कोटींची फसवणूक; गुन्हा दाखल

March 22, 2023

ट्रोल झाल्यानंतर अखेर अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने मागितली माफी

March 22, 2023

‘आता बोलायची वेळ आली आहे’, भाजप नेत्या पंकज मुंडे यांचा इशारा; पण कुणाला?

March 22, 2023

ऑटोरिक्षा चालक-मालक यांच्या अडीअडचणी सोडविण्याबाबत सरकार म्हणाले…

March 22, 2023

राज्याच्या अर्थसंकल्पात पुण्याला नेमकं काय मिळालं?

March 22, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group