India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

बोल्ड ड्रेस आणि हातात दारुचा ग्लास…. व्हिडिओमुळे अभिनेत्री श्रद्धा कपूर ट्रोल…

India Darpan by India Darpan
March 13, 2023
in मनोरंजन
0

 

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – अनेकदा साध्या सरळ लूकमध्ये दिसणारी श्रद्धा कपूर सध्या ट्रोल होते आहे. निमित्त आहे ते तिच्या नवीन चित्रपटातील नव्यानेच रिलीज झालेल्या गाण्याचं. रणबीर आणि श्रद्धा कपूर या फ्रेश जोडीचा ‘तू झूठी मैं मक्कार’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजतो आहे. ‘पठाण’चा विक्रमही हा चित्रपट मोडीत काढेल अशी चर्चा आहे. चित्रपट बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करत आहे. या चित्रपटात श्रद्धाचा बोल्ड अंदाज दिसतो आहे. नुकतेच या चित्रपटातील एक गाणे प्रदर्शित झाले आहे, मात्र नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल केलं आहे. विशेष म्हणजे, हा चित्रपट जरी प्रेक्षकांना आवडला असला, तरी यातील गाण्यांबाबत प्रेक्षक फारसे समाधानी नाहीत.

बॉलिवूडमधील क्यूट अभिनेत्री श्रद्धा कपूर आणि चॉकलेट बॉय अशी इमेज असलेल्या रणबीर कपूर यांच्या ‘तू झुठी मैं मक्कर’ या चित्रपटाला चाहत्यांचा चांगलाच प्रतिसाद मिळतो आहे. या चित्रपटातून रणबीर पहिल्यांदाच श्रद्धासोबत स्क्रीन शेअर करतो आहे. परंतु आता या चित्रपटातील एका नवीन गाण्यामुळे श्रद्धा कपूरला ट्रोल केले जात आहे. या गाण्यात श्रद्धा कपूर मद्यधुंद अवस्थेत डान्स करताना दिसत आहे. हे गाणे वीकेंडला रिलीज करण्यात आले आहे.

चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर हे गाणे खास तरुणांसाठी चित्रीत करण्यात आल्याचे समजते. या नव्या गाण्यातही श्रद्धा आणि रणबीरची जोडी धमाल करताना दिसत आहे. ‘पक्की है मैने पी रखी है’ असे या गाण्याचे शीर्षक आहे. नव्याने रिलीज झालेल्या या गाण्यात श्रद्धाने बोल्ड ड्रेस घातला आहे, आणि वाइनचा ग्लास घेऊन नाचताना ती दिसत आहे. पण, श्रद्धाच्या चाहत्यांना हे गाणे फारसे आवडलेले नाही.
श्रद्धाने इन्स्टाग्राम अकाउंटवर गाणे शेअर करताच तिला ट्रोल केले जात आहे. एकाने लिहले आहे “किती खराब गाणे आहे” तर दुसऱ्याने लिहले आहे, “मी डिसलाइकचे बटन दाबत आहे” “अजून किती फालतू गाणी येणार आहेत” असेही एकाने लिहले आहे. काहींनी तिच्या लूकवर कमेंट केली आहे. “तिला पारंपरिक कपडे चांगले वाटतात” असे एकाचे म्हणणे आहे. या चित्रपटातील एकच गाणे चांगले आहे. अशा कमेंट युजर्स करत आहेत.

दरम्यान ‘तू झुठी मैं मक्कार’ या चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी १५.७३ कोटींचा गल्ला जमवला आहे. होळी आणि धुळवडीच्या सुट्ट्यांचा या चित्रपटाला चांगलाच फायदा झाला. रणबीर आणि श्रद्धाबरोबरच या चित्रपटात डिंपल कपाडिया, बोनी कपूर आणि अनुभव सिंग बस्सी हे कलाकारही आहेत. अभिनेता म्हणून बोनी कपूर यांचा हा पहिलाच चित्रपट आहे.

View this post on Instagram

A post shared by Shraddha ✶ (@shraddhakapoor)

Actress Shraddha Kapoor Troll Due to Video


Previous Post

मिशन इयत्ता दहावी – परीक्षेत अधिक गुण मिळविण्याचे आणखी मार्ग! (व्हिडिओ)

Next Post

H3N2 विषाणूला घाबरु नका, पण हलगर्जीपणाही करु नका… बघा तज्ज्ञ काय म्हणताय…

Next Post

H3N2 विषाणूला घाबरु नका, पण हलगर्जीपणाही करु नका... बघा तज्ज्ञ काय म्हणताय...

ताज्या बातम्या

वॉशिंग मशीन…. गुजरात निरमा…. बॅनरने वेधले विधिमंडळात सर्वांचे लक्ष

March 24, 2023

धक्कादायक! सर्वात मोठे डेटा लीक उघड… १.२ कोटी WhatsApp, १७ लाख Facebook युजर्सचा डेटा चोरीला… ७ जणांना अटक

March 24, 2023

महाराष्ट्रातील या ९ शहरांमध्ये राबविला जाणार स्वच्छ हवा कार्यक्रम

March 24, 2023

हे आहेत महाराष्ट्राचे ‘महाराष्ट्र भूषण’… आजवर यांचा झाला सन्मान

March 24, 2023

इंडिया दर्पण – विचार धन – वाचा आणि नक्की विचार करा

March 24, 2023

अमिताभ बच्चन यांना होतायत अतीशय तीव्र वेदना; त्यांनीच शेअर केला दुखापतीनंतरचा अनुभव

March 24, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group