सिद्धी दाभाडे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
सुप्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टी तिच्या आरोग्याबाबत खूप जागरूक आहे. शिल्पा शेट्टी तंदुरुस्त आणि निरोगी जीवनशैलीचे नेतृत्व आणि समर्थन करण्यासाठी ओळखली जाते. शिल्पा शेट्टी सोशल मिडियावर सुद्धा सक्रीय आहे. त्याचवेळी ती सर्वांना योगा आणि जीमबद्दल प्रेरणाही देत असते. यासोबतच ती तिच्या खाण्यापिण्याचीही चांगली काळजी घेते. शिल्पाच्या बंगल्यालगत असलेल्या बागेत अनेक फळे आणि भाज्या उगवतात. शिल्पाने तिच्या सोशल मीडिया हँडलवर एक व्हिडिओ शेअर केला. त्यात दिसते आहे की ती एक फळ तोडत आहे. तिने तिच्या टोपलीमध्ये भरपूर स्टारफ्रुट जमा केलेले आहेत.
शिल्पाच्या हातात असलेले फळ म्हणजे स्टार फ्रुट. या फळाला ५ कोण आकारात रेषा असतात. ज्यामुळे त्याला स्टार फ्रुट म्हटले जाते. शिल्पाने इंस्टाग्रामवर स्टारफ्रुट तोडतानाचा व्हिडिओ शेअर केला. या फळाबद्दल माहिती देताना तिने सांगितले की, हे स्टार फ्रूट एक सुपरफूड आहे, ते व्हिटॅमिन सी चा उत्कृष्ट स्त्रोत आहे. रोगप्रतिकार शक्ती मजबूत करण्यास मदत करते. हे फळ गुलाबी मिठासोबत खाताना अधिक चविष्ठ लागते. तुम्हाला मूत्रपिंडाशी संबंधित कोणताही आजार असल्यास, कृपया ते खाणे टाळावे. स्टारफ्रुट हे फायबरचे सुद्धा उत्तम स्त्रोत म्हणून ओळखले जाते. या सोबतच ते वजन कमी करण्यास, सूज कमी करण्यास आणि पचनक्रिया सुधारण्यास मदत करते.