बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नाशिकमध्ये घर का घेतलं? अभिनेत्री प्राजक्ता माळीने सांगितलं हे कारण

by India Darpan
डिसेंबर 23, 2022 | 9:47 pm
in मनोरंजन
0
IMG 20221223 WA0020

 

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक शहराचे वातावरण इतके सुंदर आणि मनमोहक आहे की, या शहराच्या कोणीही प्रेमात पडू शकते. त्याचप्रमाणे सध्या होमेथॉन प्रदर्शनामध्ये विविध स्टॉलला भेट दिल्यानंतर त्यांच्यामार्फत घर खरेदी करणाऱ्या ग्राहकांना देण्यात येणाऱ्या सोयी सुविधा बघून मलाही नाशिकमध्ये घर घेण्याचा मोह होतो, अशी भावना प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळी यांनी व्यक्त केले.

सर्वसामान्यांच्या स्वप्नातील घरकुलाचे स्वप्न साकार करण्यासाठी नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट कौन्सिल (नरेडको) तर्फे दि. २२ ते २५ डिसेंबरपर्यंत सकाळी १० ते रात्री ९ असे चार दिवसांचे ‘होमेथॉन प्रदर्शन ‘ नाशिक शहरातील गंगापूररोडवरील डोंगरे वसतिगृह मैदान येथे सुरू असून यानिमित्त दि. २३ रोजी सांयकाळच्या सत्रात प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळी यांची मुलाखत घेण्यात आली. याप्रसंगी व्यासपीठावर नरेडकोचे नाशिकचे अध्यक्ष अभय तातेड व वंदना तातेड, होमेथॉनचे समन्वयक जयेश टक्कर व जयश्री ठक्कर, सचिव सुनील गवादे व गीता गवादे, होमेथॉनचे सहसमन्वयक शंतनु देशपांडे व असावरी देशपांडे, टायटल स्पॉन्सर दीपक चंदे व दीपा चंदे आदींसह मान्यवर उपस्थित होते.

यावेळी अभिनेत्री प्राजक्ता माळी म्हणाल्या की, मुंबईमध्ये आता घर घ्यायला जागा नाही, पुण्यातही प्रचंड गर्दी झाली आहे. त्यामुळे साहजिकच सर्वांचा ओढा नाशिककडे दिसून येतो. त्यातच इथले हवा, पाणी आणि एकूणच वातावरण अत्यंत प्रसन्न, छान आणि सुंदर आहे. तसेच येथील निसर्गाचे वातावरण अत्यंत अल्हाददायक असल्याने ऑक्सिजन देखील चांगला मिळतो. त्यामुळे मला देखील नाशिकमध्ये घर घेऊन येथे राहायला आवडेल, असेही प्राजक्ता त्यांनी सांगितले. तसेच पहिल्यांदाच मी इतके मोठे प्रदर्शन बघितले असून नरेडकोच्या प्रदर्शनामुळे बांधकाम व्यावसायिक आणि घर खरेदी करणारे ग्राहक यांच्यामध्ये एक चांगला दुआ तयार होईल, असेही त्या म्हणाल्या.

तसेच घरातील स्त्री ही कुटुंबाचा कणा असते, याची सर्वांनी जाणीव ठेवावी, ज्याप्रमाणे घरात आपण सर्व सोयी सुविधा बघतो, त्याचप्रमाणे घरातील नातेसंबंध जपणे देखील महत्त्वाचे असतात आणि घरातील नातेसंबंध, संस्कार, सर्वांच्या जेवणाची व्यवस्था यासारख्या गोष्टींसाठी घरातील स्त्री ही दिवसभर राबत असते. त्यामुळे सर्वांनी घरातील स्त्रियांची काळजी घ्यायला हवी, तसेच स्वतः स्त्रियांनी देखील आपल्या आरोग्याची काळजी घ्यायला हवी असेही प्राजक्ता माळी यांनी मत व्यक्त केले.
त्याचप्रमाणे त्र्यंबकेश्वर तिर्थक्षेत्र, नाशिकमधील गोदाघाट, येथील मिसळ, अशा सर्व गोष्टींचे आपल्याला आकर्षण आहे असेही त्यांनी स्पष्ट केले. विशेष म्हणजे यावेळी प्राजक्ता माळी यांनी सांगितले की, मी स्वतः योगा, प्राणायाम आणि ध्यान या त्रिसूत्रींचे पालन करते. त्यामुळेच माझे आरोग्य चांगले असून कोणत्याही प्रकारचा ताणतणाव मनावर जाणवत नसतो, नैराश्य देखील येत नाही, यासाठी प्रत्येकानेच योगा, प्राणायाम आणि ध्यानधारणा करायला हवी, असेही प्राजक्ता यांनी सांगितले.

यावेळी प्राजक्ता माळी यांनी पुढे सांगितले की, बालपणापासून मी कविता करत असून माझा एक कवितासंग्रह देखील प्रकाशित झाला आहे, आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अभिनय, निवेदन आणि कविता या संदर्भात महाराष्ट्रभर माझे चाहते असून त्या सर्वांचे मला प्रेम मिळाले आहे, इतकेच नव्हे तर त्यांच्याकडून अनेक विविध वस्तू देखील मिळाल्या आहेत. इतकेच नव्हे तर काही चाहात्यांनी तर त्यांच्या हातावर माझ्या नावाचा ( प्राजक्ता ) टॅटू देखील काढला आहे असा किस्सा प्राजक्ता यांनी सांगितला. यापुढे हिंदी चित्रपटात देखील मला काम करायला आवडेल, परंतु हिंदीमध्ये काम करणे मराठी कलाकारांसाठी थोडीशी अवघड गोष्ट असते तसेच चित्रपट हे माध्यम मालीकेपेक्षा थोडेसे कठीण वाटते, असेही प्राजक्ता यांनी स्पष्ट केले. रानबाजार या वेब सिरीजला चांगला प्रतिसाद मिळाला परंतु त्याआधी ट्रिझर प्रसिद्ध झाला, तेव्हा काही चुकीच्या कॉमेंट आल्या होत्या, असेही त्यांनी सांगितले. महाराष्ट्राची हास्य जत्रा या मालिकेत काम करताना अत्यंत छान वातावरण असते, असे सांगून त्यांनी ही मालीका म्हणजे माझे संचित आहे, यामध्ये काम करताना नेहमी आनंद वाटतो, असे सांगितले.

दरम्यान, यावेळी त्यांचे सहकलाकार व अभिनेता अंशुमन विचारे आणि अभिनेत्री प्रियदर्शनी इंदुलकर यांच्या प्राजक्ता माळी यांच्या विषयी व्यक्त केलेल्या भावनांच्या ध्वनीफित दाखवण्यात आली. यावेळी रॉपीड फायर राउंडमध्ये विचारलेल्या प्रश्नांनाही प्राजक्ता माळी यांनी दिलखुलासपणे उत्तरे दिली. कार्यक्रमाच्या प्रारंभी त्यांनी प्रदर्शनातील विविध स्टॉलला भेट देऊन तेथील गृहप्रकल्पांची माहिती घेतली.
प्रारंभी प्राजक्ता माळी यांचा पैठणी देऊन तसेच चांदीची भेट वस्तू देऊन सत्कार करण्यात आला. त्यानंतर प्रास्ताविकात जयेश टक्कर आणि सुनील गवादे यांनी नारेडकोची तसेच होमेथॉन प्रदर्शनाची माहिती दिली. यावेळी प्राजक्ता माळीच्या हस्ते पुरुषोत्तम देशपांडे व शाल्मली देशपांडे यांचा सत्कार करण्यात आला. तसेच प्राजक्ता माळी यांच्या हस्ते घर खरेदी करणाऱ्या ग्राहकांना चांदीचे नाणे भेट देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निर्मिती अॅडव्हर्टायझिंगचे संचालक नंदन दीक्षित व निवेदिका किशोरी किणीकर यांनी केले. आभार प्रदर्शन शंतनु देशपांडे यांनी केले.

Actress Prajakta Mali Tell About Nashik Home
Entertainment Naredco Homethon Exhibition Real Estate Property

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – शनिवार – २४ डिसेंबर २०२२

Next Post

इंडिया दर्पण – हास्य षटकार – बायको टीव्ही पाहत असते

India Darpan

Next Post
joke

इंडिया दर्पण - हास्य षटकार - बायको टीव्ही पाहत असते

ताज्या बातम्या

Untitled 1

भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड होताच रवींद्र चव्हाण यांनी केली ही घोषणा

जुलै 2, 2025
WhatsAppImage2025 07 01at3.42.34PMF0DQ

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेलवन ॲपचे केले उद्घाटन…प्रवाशांना मिळणार या सुविधा

जुलै 2, 2025
note press

नाशिक करन्सी नोट प्रेसच्या भरती परीक्षेत डमी उमेदवार, सात जणांविरुध्द गुन्हा दाखल….बनावट कागदपत्रांच्या आधारे मिळवली नोकरी

जुलै 2, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी तब्येतीची काळजी घ्यावी, जाणून घ्या, बुधवार, २ जुलैचे राशिभविष्य

जुलै 1, 2025
Untitled 2

काँग्रेसचे माजी आमदार कुणाल पाटील यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश….

जुलै 1, 2025
Untitled 1

भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण….मुंबईत घोषणा

जुलै 1, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011