इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – सात्विक चेहरा, निखळ हसू आणि उत्तम अभिनय म्हणून अभिनेत्री प्राजक्ता माळी ओळखली जाते. तिच्या या गुणांमुळेच तिच्या चाहत्यांची संख्या मोठी आहे. मराठी मालिका, वेबसीरिज, चित्रपटांमध्ये काम करत तिने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. ‘चंद्रमुखी’नंतर सोशल मीडियावरील प्राजक्ताच्या चाहत्यांच्या संख्येत चांगलीच वाढ झाली. मध्यंतरीच्या काळात प्राजक्ता फक्त अभिनयक्षेत्रापुरतीच मर्यादित नाही. तर तिने आता एक दागिन्यांचा ब्रँड देखील सुरू केला आहे.
आपल्या मनमोकळ्या स्वभावाने प्राजक्ताने सगळ्यांना आपलसं केलं आहे. परफेक्ट मॅरेज मटेरियल असलेली प्राजक्ता अनेकांची क्रश आहे यात काही नवल नाही. पण, अनेक महिलांची देखील ती फेव्हरिट आहे. मध्यंतरी ‘सकाळ’च्या पॉडकास्ट मुलाखतीमध्ये प्राजक्ता माझी लेडी क्रश होती असं अभिनेत्री ऋतुजा बागवेने म्हटलं होतं. आता पुन्हा एकदा हाच विषय चर्चेत आला आहे. ‘प्लॅनेट मराठी’च्या ‘पटलं तर घ्या’ या कार्यक्रमात प्राजक्ता आणि ऋतुजाने हजेरी लावली होती. यावेळी पुन्हा ऋतुजाचे क्रश मुद्दा चर्चेत आला. प्राजक्तालाही काही अफवांबाबत विचारण्यात आलं. प्राजक्ता माळी ही तुझी लेडी क्रश आहे, आणि तू तिच्याबरोबर लेस्बियन पार्टनर व्हायला तयार झाली आहेस, अशी विचारणा कार्यक्रमाच्या सूत्रसंचालिकेने केली. हे ऐकल्यानंतर ऋतुजा आणि प्राजक्ताचे चेहऱ्यावरील हावभाव अगदी बघण्यासारखे होते. या प्रश्नानंतर दोघींनीही एकमेकींकडे बघितलं. तसेच जोरात हसू लागल्या.
झी मराठीवरील ‘नांदा सौख्य भरे’, कलर्स मराठीवरील ‘चंद्र आहे साक्षीला’ अशा दमदार मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे ऋतुजा बागवे होय. ऋतुजाने मालिकाविश्वात आपली एक खास ओळख निर्माण केली आहे. प्राजक्ताप्रमाणेच ऋतुजाची एक वेगळी ओळख आहे. अभिनेत्रीची चांगली फॅनफॉलोईंग आहे.
गंमत म्हणजे या प्रश्नानंतर प्राजक्ता म्हणाली, “मी यावर्षी लग्न करणार आहे”. ऋतुजाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे या कार्यक्रमाचा प्रोमो शेअर केला आहे. तसेच या कार्यक्रमात खासगी आयुष्याबाबत काही प्रश्नही ऋतुजा आणि प्राजक्ताला विचारण्यात आले आहेत.
Actress Prajakta Mali Lesbian Relationship Answer Video