मुंबई (दर्पण इंडिया वृत्तसेवा) – सध्या विवाह समारंभांचा धूमधडाकाही सुरू आहे. त्यातच बॉलीवूड चित्रपट सृष्टी असो की टीव्ही सह अन्य इंटरटेनमेंट माध्यम या मधील कलाकार आपल्या आवडत्या जोडीदारासोबत लग्नगाठ बांधत आहेत. काहीजण भारतातील प्रसिद्ध ठिकाणी हा समारंभ करत असून काही जण परदेशातील प्रसिद्ध स्थळी हा विधी पार पाडत आहेत. आता आणखी एका लग्नाची बातमी येऊन थडकली आहे. हा समारंभ थंडीच्या ऋतूमध्ये समुद्रकिनारी निसर्गरम्य वातावरणात गोव्यातील झगमगत्या दुनियेत साजरा होणार आहे. यापुर्वी एंटरटेनमेंट इंडस्ट्रीशी संबंधित अनेक स्टार्सनी गेल्या वर्षी लग्नगाठ बांधली. यंदाही अनेक स्टार्सची ओढ लागली आहे. टीव्ही आणि चित्रपट अभिनेत्री मौनी रॉय लवकरच विवाहबद्ध होणार आहे. खूप काळापासून या अभिनेत्रीचे नाव दुबईस्थित व्यावसायिक सूरज नांबियारसोबत जोडले जात आहे. तसेच दोघेही गेल्या काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत.
काही दिवसांपूर्वी अशी माहिती समोर आली होती की, मौनी आणि सूरज या महिन्यात म्हणजे जानेवारीत इटली किंवा दुबईमध्ये लग्न करू शकतात. परंतु आता हे कपल गोव्यात लग्न करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. यासोबतच मौनी रॉयच्या लग्नाच्या तयारीशी संबंधित अनेक माहिती समोर आली आहे.
https://twitter.com/Roymouni/status/1476917765248196611?s=20
वास्तविक गेल्या वर्षभरापासून मौनी रॉयच्या लग्नाच्या बातम्या समोर येत आहेत. याच काळात मौनी रॉय आणि तिच्या काही गर्ल फ्रेंडचे अनेक फोटो देखील समोर आले होते, त्यानंतर असा अंदाज लावला जात होता की, तिने गोव्यात बॅचलर पार्टी देखील साजरी केली आहे. यात अभिनेत्री आश्का गोराडियाने डिसेंबर महिन्यात इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले होते, त्यामध्ये मौनी रॉय आणि तिचे काही जवळचे मित्रही तिच्यासोबत दिसले होते.
ताज्या रिपोर्टनुसार, मौनी रॉय आणि सूरज नांबियारचे लग्नापूर्वीचे कार्यक्रम या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सुरू होतील. या ‘लग्नाचे विधी दोन दिवस चालतील. प्री-वेडिंग फंक्शन दि. 26 जानेवारीपासून सुरू होणार असून दुसऱ्याच दिवशी म्हणजे दि. 27 रोजी मौनी-सूरज लग्नगाठ बांधणार आहेत. दोघांनीही दक्षिण गोव्यात पंचतारांकित हॉटेल बुक केले असून लग्नाची तयारी जोरात सुरू आहे. याकरिता विवाह स्थळ पांढऱ्या रंगाच्या थिमने सजवण्यात येणार आहे.