नाशिक – एसटी कामगार संघटनेच्या पंधरा आंदोलकांवर जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.बुधवारी सायंकाळी साडे पाचला एनडी पटेल रोडवर एसटी महामंडळाच्या आगाराच्या प्रवेशद्वारावर जमावबंदीचा आदेश मोडून गर्दी करुन बसलेल्या आंदोलकावर ही कारवाई करणयात आली. सुप्रिया तुकाराम काकड, जनार्दन जगताप, संजय मोहीते, सुनील राठोड, एन.जे.जाधव, तानाजी जाधव, भिमराव शिंदे यांच्यासह इतर दहा ते पंधरा जणावर पोलिसांनी जमावबंदी प्रतिबंधात्मक आदेश १५१ (१) (३) ही कारवाई करण्यात आली आहे. जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करीत, पोलीस परवानगी न घेता जमावबंदी आदेश लागू असतांना एकत्र जमून घोषणाबाजी केल्याचा आरोप या आंदोलनकांवर ठेवण्यात आला आहे. शहरात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर दिवसा जमावबंदी आणि रात्री संचारबंदीचा आदेश लागू आहे. राज्यात सगळीकडेच या आदेशाचे पालन सुरु असून कोरोना नियंत्रणासाठी प्रतिबंधात्मक आदेशाची अंमलबजावणी सुरु असतांना शहरात एसटी कामगार संघटनेचे पदाधिकारी आंदोलनासाठी संबधित जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केले.