मंगळवार, जुलै 8, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

रातोरात मिळालेली प्रसिद्धी झाली क्षणभंगुर; एका रात्रीत बदलले या अभिनेत्रीचे आयुष्य

by Gautam Sancheti
सप्टेंबर 8, 2022 | 5:21 am
in मनोरंजन
0
EfpgUsOXsAARqTc

 

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – सिनेमाचे वेड कोणाला काय करायला लावेल, काही सांगता येत नाही. या वेडानेच भारावून जात भारतभरातून अनेकजण हे मुंबईचा रस्ता धरतात. आजही कितीतरी स्ट्रगलिंग ऍक्टर मुंबईत स्टुडिओचे उंबरे झिजवत असतात, तेही केवळ एका ब्रेकसाठी. अभिनेत्री, अभिनेता बनण्याची ही जिद्द काहींना रातोरात प्रसिद्धी झोतात आणते. परंतु नियती किती निष्ठुर असते याचा प्रत्यय एका अभिनेत्रीला आला आहे.

‘आशिकी’ या चित्रपटातून रातोरात प्रसिद्ध झालेली अभिनेत्री अनु अग्रवाल हिचा अचानक अपघात झाला त्यात जवळपास महिनाभर ती कोमात गेली. त्यानंतर मात्र बॉलिवूडपासून ती लांब झाली ती झालीच. एकेकाळी सर्वांना वेड लावलेल्या राहुल रॉय आणि अनु अग्रवाल या जोडीपैकी अनुला आज कोणी ओळखू देखील शकणार नाही. नुकतेच तिने तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

९० चे दशक हे बॉलीवूडसाठी दर्जेदार चित्रपट आणि प्रेमाचं दशक होते, असच म्हणावं लागेल. याकाळात आलेल्या चित्रपटांनी युवकांच्या मनावर राज्य केलं. याच काळात राहुल रॉय आणि अभिनेत्री अनु अग्रवालचा ‘आशिकी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने तरुणाईला अक्षरशः वेड केलं होत. या चित्रपटाच्या गाण्यांनी तेव्हा नव्हे तर रसिक आजही मंत्रमुग्ध होतात. त्यातील तरुणाईला ‘आशिकी’ शिकवणारी अभिनेत्री अनु अग्रवाल हॉट अँण्ड बोल्ड लूकसाठी नेहमीच चर्चेत असायची. चित्रपटांच्या निवडीसाठी ती बॉलिवूडमध्ये प्रसिद्ध होती.

View this post on Instagram

A post shared by Anu Aggarwal (@anusualanu)

अनु अग्रवालने आपल्या करिअरची सुरुवात मॉडेलिंगमधून केली होती. तिच्या अभिनयाची इंडस्ट्रीमध्ये चांगलीच प्रशंसा झाली. मात्र, या अभिनेत्रीला काही दिवसांतच अभिनयाला निरोप द्यावा लागला आणि तिने योगासनांना तिच्या आयुष्यातील महत्त्वाचा भाग बनवला. ‘आशिकी’ चित्रपटानंतर अनु अग्रवालचा मोठा कार अपघात झाला. ही अपघात इतका मोठा होता की, तब्बल २९ दिवस अभिनेत्री कोमात होती. अनु अग्रवालने तिच्या कारकिर्दीत केवळ दोन चित्रपटांत काम केले आहे, तिचा पहिला चित्रपट होता ‘आशिकी’ आणि १९९३ मध्ये आलेल्या दुसर्‍या चित्रपटाचे नाव होते खलनायिका. १९९९ मध्ये झालेल्या एका अपघातानंतर तिच्या शरीराला अर्धांगवायू झाला. त्यानंतर तिने कधीही इंडस्ट्रीकडे वळून पाहिले नाही.

View this post on Instagram

A post shared by Anu Aggarwal (@anusualanu)

एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीवेळी तिने सांगितले की, १९९९ मध्ये माझा मोठा अपघात झाला होता, या अपघातानंतर मी कोमामध्ये गेलो. मी अपघातापूर्वी आश्रमात राहत होते, जिथे मला अध्यात्माची गोडी लागली. अपघातानंतर काय घडले हे मला आठवत नाही. पण मला माझं नाव आठवलं. २००१ च्या सुमारास, मी या प्रपंचातून निवृत्त झाले. त्यानंतर मी ध्यानधारणा सुरू केली. मुलाखतीत बोलताना अनुने सांगितले होते की, २००६ साली तिने बॉलिवूडमध्ये पुन्हा प्रवेश करण्याबद्दल विचार केला होता, ती बर्‍याच लोकांशी बोलू लागली आणि त्यांना भेटायला देखील गेली. पण त्या काळात लोकांनी तिला साथ दिली नाही. उलट लोकांनी तिला ट्रोल करायला सुरुवात केली. ती खूप अस्वस्थ झाली आणि तिने पुन्हा त्या मार्गापासून स्वतःला दूर केले. त्यानंतर तिने स्वतःच्या आयुष्यावर आधारित ‘ANUSUAL – MEMOIR OF A GIRL WHO CAME BACK FROM THE DEAD’ हे पुस्तक लिहिले. ते प्रचंड गाजले. आता अनुमध्ये खूप बदल झाला असून तिला ओळखणं शक्य नाही.

View this post on Instagram

A post shared by Anu Aggarwal (@anusualanu)

Actress Anu Aggarwal Life Journey Accident
Aashiqui Fame

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

सावधान! व्हॉट्सॲपवर आलेली लिंक उघडली आणि त्याच क्षणाला बँक खातं रिकामं झालं

Next Post

भारतीय अन्न महामंडळात (FCI) तब्बल ५ हजार पदांवर भरती; आजच असा करा अर्ज

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
job

भारतीय अन्न महामंडळात (FCI) तब्बल ५ हजार पदांवर भरती; आजच असा करा अर्ज

ताज्या बातम्या

Untitled 22

घटना मीरा रोडमध्ये, मोर्चासाठी घोडबंदर रोडचा मार्ग सुचवला…मुख्यमंत्र्यांच्या प्रतिक्रियेवर मनसेचे उत्तर

जुलै 8, 2025
Untitled 22

मीरा भाईंदरमध्ये मनसेच्या मोर्चाला परवानगी नाकारली, वातावरण तापलं

जुलै 8, 2025
GvQZks6WwAArk6Q

पुणे महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची विटंबना…काँग्रेसने धरणे आंदोलन करत व्यक्त केला संताप

जुलै 8, 2025
Untitled 21

बनावट जीआरच्या आधारे तब्बल ७ कोटी रुपयांची विविध विकासकामे….नेमकं घडलं काय

जुलै 8, 2025
Untitled 20

मंत्री संजय शिससाट यांच्या अडचणीत वाढ…मुख्यमंत्री फडणवीस यांनी विट्स हॉटेल निविदा प्रक्रियेची उच्चस्तरीय चौकशी लावली

जुलै 8, 2025
kanda onion

शेतकऱ्यांकडून थेट कांदा खरेदी करा; राज्याच्या मंत्र्यांची केंद्राकडे ठोस मागणी

जुलै 8, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011