मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – वेगळ्या धाटणीच्या आणि निवडक भूमिका करणारी अभिनेत्री आलिया भट्ट ही अल्पावधीतच प्रेक्षकांच्या आवडत्या नायिकांच्या पंक्तीत जाऊन बसली. कारण जोहरच्या ‘स्टुडन्ट ऑफ द इयर’ या चित्रपटातून तिने हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं होतं. काही महिन्यांपूर्वीच तिने रणबीर कपूर याच्यासोबत लग्नगाठ बांधली. आणि सध्या ती प्रेग्नन्ट असल्याच्या चर्चा रंगत आहेत. तिच्या प्रेग्नन्सीवरुन होणाऱ्या चर्चांमुळे आलिया भडकली आहे.
आलियाच्या प्रेग्नन्सीच्या बातमीमुळेच विविध चर्चांना उधाण आलं आहे. आताच लग्न झालं मग लगेच प्रेग्नन्ट कशी यापासून ते आलिया प्रेग्नन्सीमध्ये कोणते कपडे घालते? इथपर्यंत या चर्चा रंगतात. दररोज होणाऱ्या या चर्चांनी स्वतः आलिया वैतागली आहे. एका मुलाखतीमध्ये तिने याबद्दल जाहीररित्या नाराजी व्यक्त केली आहे. काही दिवसांपूर्वी आलियाने ‘मॅशबेल इंडिया’ला एक मुलाखत दिली, त्यात तिने याचा उल्लेख केला आहे. ती म्हणते, माझं लग्न झालं तेंव्हा मी नववधू होते. त्यावेळी त्यावर चर्चा रंगल्या होत्या. आणि आता प्रेग्नन्ट असल्याची बातमी आली तर त्यावरही लोकांचं काही ना काही मत आहेच.
आलिया म्हणते, खरं तर असं असू नये. आमच्या वैयक्तिक आयुष्यात किती दखल द्यायची याचे भान असायला हवे. माझं लग्न झाल्यावर त्यावर चर्चा, आता प्रेग्नन्सीबद्दल चर्चा. आलिया गरोदरपणात कपडे कोणते घालते इथपासून ते मी ही जबाबदारी पेलू शकेन की नाही, यावर सगळे चर्चा करत आहेत. मला तर असं वाटतं की, यांच्याकडे काही बातम्या नसाव्यात म्हणून ते माझ्यासंबंधातील अशा खासगी गोष्टींची चर्चा करत आहेत. मी काय कपडे घातले किंवा मी काय घालावे हा माझा वैयक्तिक प्रश्न आहे. त्याची जाहीररित्या चर्चा करणं काही योग्य नाही त्यामुळे तुम्ही देखील या चर्चा थांबवा, असे आलिया म्हणते. आताच काही दिवसांपूर्वी आलिया आणि रणबीर एकत्र दिसले होते. तेंव्हा आलियाने घट्ट कपडे घातले होते. त्यावरूनही तिच्यावर टीका झाली होती.
Actress Alia Bhatt on Pregnancy
Bollywood Entertainment