शुक्रवार, जुलै 4, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

अखेर आलिया भट्टने मागितली जाहीर माफी

by India Darpan
सप्टेंबर 19, 2022 | 5:18 am
in मनोरंजन
0
Alia Bhatt

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – अनेक दिवसांनी बॉक्स ऑफिसवर ‘ब्रम्हास्त्र’ने धूम माजवली आहे. बॉलीवूडमध्ये दर्जेदार चित्रपटांची वानवा आणि बॉयकॉटच्या  ट्रेंडने मरगळ आणली होती. आलिया भट्ट, रणबीर कपूर या जोडीने ‘ब्रम्हास्त्र’च्या रूपाने प्रेक्षकांना चित्रपटगृहात खेचून आणले आहे. कलाकार त्याच्या भूमिकेत कितीही आवडता असला तरी माणूस म्हणून तो कसा आहे यावर त्याचे चाहते निर्माण होत असतात. तुमचा स्वभाव हा नम्र असायला हवा. तुमच्या चाहत्यांना, आजूबाजूच्या माणसांना तुम्ही किती आदर देता हे महत्त्वाचे आहे. याचाच प्रत्यय आलिया भट्टच्या बाबतीत आला आहे.

माफी मागितल्याचा आलियाचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यात तिने फोटोग्राफरची माफी मागितली आहे. आलिया गरोदर असल्याने तसेच या दिवसात ‘ब्रम्हास्त्र’साठी तिची धावपळ झाल्याने ती थकली आहे. तेव्हा फोटोसाठी पोज न देता आल्याने तिने नम्रपणे सर्वांची माफी मागितली आहे.

काही दिवसांपूर्वीच आलिया भट्टने ती आई होणार असल्याची बातमी शेअर केली. अशा अवस्थेत देखील ती ‘ब्रह्मास्त्र’च्या प्रमोशनसाठी मेहनत घेत होती. विविध शहरांमध्ये जाऊन ती या चित्रपटाचे प्रमोशन करत होती. या काळात अनेक कार्यक्रमांमध्येही ती सहभागी झाली. दरम्यानच्या काळात अनेकदा आलियाला कंबरदुखीचा त्रास होत असूनही ती प्रमोशन करताना दिसली. आता चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर ती नुकतीच करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनच्या ऑफीसबाहेर दिसली.

View this post on Instagram

A post shared by Varinder Chawla (@varindertchawla)

गाडीत बसलेली आलिया चेहऱ्यावरून दमलेली दिसत होती. नेहमीप्रमाणे आलियाला पाहून तिथे असलेले फोटोग्रफार्स तिचे फोटो काढण्यासाठी धावले. त्यावेळी त्यांनी आलियाला गाडीतून बाहेर येत फोटोसाठी पोज देण्याची विनंती केली. परंतु आलियाने त्या सर्वांची माफी मागितली आणि त्यांना म्हणाली की, “मला माफ करा, मी आत्ता चालूही शकत नाही. त्यामुळे मी गाडीतून बाहेर येत नाही. तुम्हा सर्वांचे खूप आभार.”

आलिया गरोदर असल्याने या काळात होणाऱ्या कंबरदुखी, थकवा अशा सगळ्या गोष्टींना सामोरी जात आहे. त्यामुळेच ती गाडीतून उतरली नाही. याबद्दल तिने तिथे असलेल्या फोटोग्राफर्सची नम्रपणे माफी मागितली. आणि सर्वांनी तिची अवस्था समजून घेतली. अनेक ताणतणाव असताना देखील तुम्ही समोरच्याला तुमचा मुद्दा कसा पटवून देता यावर तो कलाकार माणूस म्हणून कसा हे ठरत असतं.

Entertainment Bollywood Actress Alia Bhatt Apologized For This Reason

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

…म्हणून अभिनेत्री काजोलचे शिक्षण राहिले अर्धवट

Next Post

निस्सीम देवीभक्त! जागरण सोहळ्यासाठी विकले चक्क शेतच; निमंत्रित केले अनुराधा पौडवाल यांना

India Darpan

Next Post
FcN0slqaIAE9QvG

निस्सीम देवीभक्त! जागरण सोहळ्यासाठी विकले चक्क शेतच; निमंत्रित केले अनुराधा पौडवाल यांना

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी संयमाने आणि चिकाटीने मार्ग काढावा, जाणून घ्या, शुक्रवार, ४ जूलैचे राशिभविष्य

जुलै 3, 2025
Vidhanparishad prashnottare 04 1024x512 1

नदी शुद्धीकरण प्रकल्पासाठी तीन टप्प्यांत काम सुरू…विधानपरिषदेत मंत्री उदय सामंत यांची माहिती

जुलै 3, 2025
doctor

आता धर्मादाय रुग्णालयांत या योजना बंधनकारक….तक्रारींचे निराकरण करण्यासाठी देखरेख समिती

जुलै 3, 2025
Vidhan Sabha New 5 750x375 1

राज्यात १२,८०० थॅलेसेमिया रुग्ण, निकृष्ट गोळ्यांची चौकशी, चाचणी सक्तीची…ठाकरे यांच्या मागणीनंतर मंत्रींचं आश्वासन

जुलै 3, 2025
Untitled 35

आता वाहनांसाठी एचएसआरपी प्लेट बसविण्यासाठी ही आहे अंतिम मुदत….

जुलै 3, 2025
accident 11

धावत्या दुचाकीवरून पडल्याने ५० वर्षीय महिलेचा मृत्यू….द्वारका परिसरातील घटना

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011