India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

सतीश कौशिक मृत्यूप्रकरणात नवा ट्विस्ट; फार्म हाऊसवरील ‘तो’ उद्योगपती फरार… रुममध्ये सापडली औषधे…

India Darpan by India Darpan
March 11, 2023
in Short News
0

 

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – अभिनेता व दिग्दर्शक सतीश कौशिक यांचे होळीच्या दुसऱ्या दिवशी सकाळी निधन झाले. अभिनेते अनुपम खेर यांनी सर्वप्रथम सोशल मीडिया पोस्टद्वारे या दुःखद बातमीची माहिती दिली. प्राथमिक तपासणीच्या आधारे, अभिनेत्याच्या मृत्यूचे कारण हृदयविकाराचा झटका असल्याचे सांगण्यात आले. पण आता या प्रकरणात एक नवा खुलासा झाला आहे. दिल्ली पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सतीश कौशिक यांचा मृत्यू संशयास्पद परिस्थितीत झाला आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली पोलिसांचे पथक फार्म हाऊसमध्ये तपासणीसाठी गेले असता पोलिसांना काही ‘आक्षेपार्ह औषधे’ सापडली. सध्या पोलीस अभिनेत्याच्या सविस्तर पोस्टमॉर्टम रिपोर्ट आणि व्हिसेरा रिपोर्टची वाट पाहत आहेत. त्यानंतरच संपूर्ण चित्र स्पष्ट होईल.

सतीश कौशिक होळीचा सण साजरा करण्यासाठी मुंबईहून दिल्लीत आले होते. येथे त्यांनी होळी पार्टीला हजेरी लावली. अभिनेत्याच्या मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी दिल्ली पोलिसांनी होळी पार्टीच्या वेळी फार्महाऊसवर उपस्थित असलेल्या पाहुण्यांची संपूर्ण यादी तयार केली आहे. सतीश कौशिकच्या मृत्यूनंतर फरार झालेल्या उद्योगपतीचीही पोलिसांना चौकशी करायची आहे.

एएनआय न्यूज एजन्सीनुसार, दिल्ली पोलिस म्हणतात, ‘अभिनेत्याच्या मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी ते तपशीलवार पोस्टमॉर्टम रिपोर्टची वाट पाहत आहेत. जिल्हा पोलिसांच्या गुन्हे पथकाने दक्षिण पश्चिम दिल्लीतील होळी पार्टी सुरू असलेल्या फार्महाऊसमधून काही ‘औषधे’ जप्त केली आहेत.

#SatishKaushikDeath | Delhi Police say they are waiting for the detailed postmortem report to know the exact cause of the death. A crime team of District Police visited the farmhouse in Southwest Delhi where the party was organised & recovered some 'medicines': Sources

— ANI (@ANI) March 11, 2023

Actor Satish Kaushik Death Case Police Investigation


Previous Post

जेलरोडवरील ‘त्या’ मारहाणीचा व्हिडिओ आला समोर; पोलिसांना हल्लेखोर सापडणार?

Next Post

रमेश अग्रवाल यांचे पोस्टमॉर्टम करणाऱ्या डॉक्टरने केला हा मोठा खुलासा

Next Post

रमेश अग्रवाल यांचे पोस्टमॉर्टम करणाऱ्या डॉक्टरने केला हा मोठा खुलासा

ताज्या बातम्या

मोदी सरकारचा मास्टरस्ट्रोक; केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी केली ही मोठी घोषणा

March 24, 2023
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी आज खर्चाची तयारी ठेवावी; जाणून घ्या, शनिवार, २५ मार्च २०२३चे राशिभविष्य

March 24, 2023

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – शनिवार – २५ मार्च २०२३

March 24, 2023

इंडिया दर्पण – हास्य षटकार – १ कोटीची लॉटरी

March 24, 2023

आदिवासी तरुणांना संधी का मिळत नाही? सरकारी योजना त्यांच्यापर्यंत पोहचतात का? खरं आणि जळजळीत वास्तव हे आहे…

March 24, 2023

कोल्हापूरमध्ये येणार हा मोठा प्रकल्प… ८ हजार कोटींची गुंतवणूक… ५ हजार जणांना रोजगार

March 24, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group