मुकुंद बाविस्कर, इंडिया दर्पण वृत्तसेवा
बॉलीवूडमध्ये कोणताही कलाकार असो, त्यांच्याविषयी रसिकांना नेहमीच उत्सुकता असते, हिरो म्हणजे मुख्य भूमिका करणारा अभिनेता असो की व्हिलन म्हणजे खलनायक, अनेक अभिनेत्यांनी यांच्या दमदार अभिनयाने हिंदी चित्रपट सृष्टीत खलनायकाच्या भूमिका गाजल्या आहेत. यातील एक प्रमुख नाव म्हणजे रजा मुराद होय. बॉलिवूडमध्ये आतापर्यंत अनेक खलनायक त्यांच्या अभिनय आणि आवाजासाठी रजा मुराद हे प्रसिद्ध आहेत. आपल्या जबरदस्त अभिनयाने आणि आवाजाने इंडस्ट्रीत ठसा उमटवणाऱ्या रझा मुरादच्या नावाचा या यादीत खूप वर समावेश आहे. त्यांनी आतापर्यंत साकारलेली सर्व पात्रे अप्रतिम आहेत. रझा मुराद यांनी 250 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे, जे उत्कृष्ट होते.
रझा मुराद आणि समिना मुराद यांचा विवाह दि. 2 मे 1982 रोजी झाला होता. लग्नाच्या वेळी रझा 31 वर्षांची होते आणि समिना फक्त 16 वर्षांची होती. रझा मुराद आणि समिना यांना अली मुराद आणि मुलगी आयेशा मुराद नावाची दोन मुले आहेत. त्यांच्या फिल्मी करिअरसोबतच दोघांची लव्ह लाईफही खूप इंटरेस्टिंग आहे. एवढा मोठा अभिनेता असूनही रझा मुराद यांचे व्यक्तिमत्त्व साधे असून वैयक्तिक जीवन अतिशय सरळ आहे. कारण रझा मुराद यांनी समिना मुराद यांना न पाहताच लग्नाला होकार दिला होता. याचा खुलासा खुद्द अभिनेत्याने त्यांच्या एका मुलाखती दरम्यान केला होता.
रझा मुराद यांनी समिना मुरादसोबतच्या पहिल्या भेटीचा किस्साही सांगितला.
मुराद यांनी सांगितले होते की, मी समीनाला दुरूनच पहिल्या नजरेत ओळखले होते. या बाबत रझा मुराद म्हणाले, ‘मी दिल्लीहून भोपाळला गेलो होतो. कारण माझी पत्नी भोपाळची आहे, मी भोपाळ विमानतळावर उतरलो आणि बाहेर आलो तेव्हा मला दुरून एक मुलगी दिसली. तिच्या हातात गुलाबाचे फुल होते. तिला पाहून माझी खात्री पटली, ही माझी भावी पत्नी आहे आणि नेमके तेच घडले. चित्रपटांमध्ये भूमिका करताना रझा मुराद मुलींची छेड काढताना किंवा अवैध काम करताना दिसतात. त्यामुळे त्यांची प्रतिमा मुलींमध्ये चांगली नव्हती. याच कारणामुळे त्यांनी घरच्यांच्या इच्छेनुसार समिना मुरादशी लग्न केले. रझा मुराद यांनी लग्नाला हो म्हणण्यापूर्वी समीनाचा फोटोही पाहिला नव्हता. रझा मुराद यांनी दिलेल्या एका मुलाखतीत हा खुलासा केला आहे. या मुलाखती दरम्यान त्याने पत्नी समिना मुरादसोबतची त्याची प्रेमकहाणी सांगितली.
ते म्हणाला की, ‘माझं अरेंज्ड मॅरेज होते आणि विचित्र गोष्ट म्हणजे लग्नाची तारीख ठरल्यानंतरही मी माझ्या बायकोला बघितले नाही. तसेच मी त्याच्याशी कधी बोललोही नव्हतो, त्याचा फोटोही पाहिला नव्हता. मात्र मला त्यांच्या आईच्या निवडीवर विश्वास आहे, म्हणून मी काहीही विचार न करता हो म्हटले. ‘सर्व गोष्टी ठरल्यानंतर मी भोपाळला गेलो, कारण मी त्यांना कधीच पाहिले नव्हते. माझ्या आईला ती आवडली होती आणि माझा तिच्या निवडीवर विश्वास होता. रझा मुराद यांनी सांगितले की, मी समीनाला दुरूनच पहिल्या नजरेत ओळखले होते. दरम्यान, मुराद यांनी अनेक चित्रपटांमध्ये खलनायकाची भूमिका केल्या आहेत. या चित्रपटांमध्ये ‘मोहरा’, ‘जान की कसम’, ‘नमक हराम’, ‘त्रिदेव’, ‘दुसरी सीता’, ‘राम लखन’ या सुपरहिट चित्रपटांचा समावेश आहे.