India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

तब्बल ३५ वर्षांनी अभिनेता रणधीर कपूर – बबिता एकत्र येणार; या कारणामुळे झाले होते वेगळे

India Darpan by India Darpan
March 5, 2023
in मनोरंजन
0

 

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – बॉलीवूडमध्ये एकत्र काम करणाऱ्या अनेक जोड्या जुळतात आणि तुटतातही. काही क्वचितच जोड्या या कायमस्वरूपी एकत्र दिसतात. धर्मेंद्र – हेमा मालिनी, अमिताभ – जया ही त्याचीच काही उदाहरणे. कपूर खानदानातील रणधीर आणि बबिता यांचेही लव्ह मॅरेज झाले होते. मात्र, गेली जवळपास ३५ वर्षे ते घटस्फोट न घेता एकमेकांपासून वेगळे राहत होते. आता तेही एकत्र राहणार असल्याची माहिती आहे.

अभिनेत्री करीना कपूर – खान आणि करिश्मा कपूर यांचे पालक आता एकत्र राहू लागले आहेत. ज्येष्ठ अभिनेते रणधीर कपूर आणि अभिनेत्री बबिता यांच्यातील दुरावा आता संपला आहे. रणधीर – बबिता यांचे १९७१ मध्ये लग्न झालं आणि १९८८ मध्ये ते वेगळे झाले. त्यानंतर आता तब्बल ३५ वर्षांनी पुन्हा एकत्र आले आहेत. विशेष म्हणजे इतके दिवस दूर राहूनही त्यांनी घटस्फोट घेतला नव्हता. आता पुन्हा एकत्र राहण्याच्या त्यांच्या निर्णयाने केवळ कुटुंबीय आणि नातेवाईकच खूश नाहीत तर त्यांचे चाहतेही खूश झाले आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, बबिता सर्व सामान घेऊन पतीच्या वांद्रे येथील नवीन घरात राहण्यासाठी पोहोचल्या आहेत.

बबिता आणि रणधीर कपूर सोबत राहणार असल्याने त्यांच्या मुलीही आनंदी आहेत. आता उतारवयात दोघंही एकाच छताखाली राहू शकतील आणि एकमेकांची काळजी घेऊ शकतील. प्रेमविवाह असूनही लग्नानंतरही ते मतभेदांमुळे वेगळे राहिले. अशा परिस्थितीत ३५ वर्षांनंतर त्यांचं पुन्हा एकत्र येणं ही सर्वांसाठी मोठी गोष्ट आहे. रणधीर कपूर यांची तब्येत आता फार चांगली नसते, बबिता त्यांच्याजवळ असल्याने त्यांची व्यवस्थित काळजी घेता येईल.

रणधीर कपूर आणि बबिता यांची पहिली भेट १९६९ च्या ‘संगम’ चित्रपटाच्या सेटवर झाली होती. या चित्रपटाच्या माध्यमातून दोघांची एकमेकांची ओळख झाली आणि नंतर हळूहळू त्यांच्यात भेटीगाठी वाढत गेल्या. राज कपूर यांना रणधीर कपूर यांच्या अफेअरबद्दल कळताच “तू तिच्याशी लग्न कधी करणार आहेस?” असा प्रश्न त्यांना विचारला. तेव्हा या दोघांचाही लग्नाचा कोणताही प्लॅन नव्हता. पण घरच्यांच्या सांगण्यावरून त्यांनी ६ नोव्हेंबर १९७१ रोजी लग्नगाठ बांधली.

८०च्या दशकात रणधीर कपूर यांचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई करू शकत नव्हते. त्यांचा कारकिर्दीचा आलेख खाली घसरत होता. त्यामुळे ते खूप अस्वस्थ होत होते, आणि त्यांनी दारू पिण्यास सुरुवात केली. त्यांच्या दारू पिण्यामुळे बबिता यांनाही त्रास होऊ लागला. यावरून दोघांमध्ये अनेकदा वाद झाले. तर दुसरीकडे मुलींनी चित्रपटात काम करावं, हेही रणधीर यांना मंजूर नव्हतं, त्यामुळेही त्यांच्यात वाद व्हायचे. अशातच १९८८ साली त्यांच्या नात्यात दुरावा आला आणि बबिता यांनी आपल्या दोन्ही मुलींना घेऊन वेगळे राहायला सुरुवात केली.

View this post on Instagram

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

Actor Randhir Kapoor Babita Will Come together after 35 years


Previous Post

लग्नानंतर हॉटेलमधील हा व्हिडिओ शेअर केला… अंकिता लोखंडे जोरदार ट्रोल…. असं काय आहे त्यात?

Next Post

मृतदेहाच्या शर्टच्या खिशातील तिकीटावरुन धुळे पोलिसांनी शोधले हत्यारे; पत्नीनेच संपवले स्वत:च्या पतीला

Next Post
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

मृतदेहाच्या शर्टच्या खिशातील तिकीटावरुन धुळे पोलिसांनी शोधले हत्यारे; पत्नीनेच संपवले स्वत:च्या पतीला

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

आज या व्यक्तींनी कुठलाही व्यवहार करु नये; जाणून घ्या, मंगळवार, २१ मार्च २०२३चे राशिभविष्य

March 20, 2023

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – मंगळवार – २१ मार्च २०२३

March 20, 2023

इंडिया दर्पण – हास्य षटकार – युवक आणि युवती

March 20, 2023

ओले खोबरे खावे की सुके? नारळाच्या पाण्याचे आहेत एवढे सारे फायदे; आहारात नक्की समावेश करा

March 20, 2023

शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे; गारपिट नुकसानीचे पंचनामे येत्या दोन दिवसांत अंतिम करणार – मुख्यमंत्री

March 20, 2023
संग्रहित फोटो

अॅड. गुणरत्न सदावर्तेंच्या ठाण्यातील कार्यालयात चोरी; हे सर्व सामान लंपास

March 20, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group