इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – बॉलीवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. त्याची पत्नी आलियाने त्याच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. आत्तापर्यंत या अभिनेत्याने या प्रकरणी कोणतीही प्रतिक्रिया दिली नसली तरी आता त्याने याबाबत आपले मौन सोडले आहे. ट्विटरवर एक पोस्ट शेअर करुन त्याने अनेक बाबींचा खुलासा केला आहे.
ट्विटरवर पोस्ट शेअर करत नवाजुद्दीन सिद्दीकीने लिहिले आहे की, हे आरोप नाही तर मी माझ्या भावना व्यक्त करत आहे. या कॅप्शनसोबत त्याने त्याचे स्पष्टीकरणही जोडले आहे, जे त्याला याप्रकरणी सांगायचे आहे. निवेदनात अभिनेत्याने त्याच्यावर लावण्यात आलेले आरोप आणि मुलांच्या शिक्षणाबाबत अनेक गोष्टी लिहिल्या आहेत.
अभिनेत्याने लिहिले आहे की, माझ्या मौनामुळे लोक मला वाईट मानत आहेत, मी आतापर्यंत गप्प बसलो होतो कारण मला माहित आहे की माझी मुलं कुठून तरी हा तमाशा वाचतील. दरम्यान, सोशल मीडियावर आणि पत्रकारांनी मिळून माझ्या या घरगुती प्रकरणाचा खूप आनंद घेतला आहे, परंतु त्यानंतरही मला त्याबद्दल काही गोष्टी ठेवायच्या आहेत.
त्याने पहिल्या मुद्द्यात लिहिले आहे की, मी सर्वांना सांगू इच्छितो की मी आणि आलिया खूप वर्षांपूर्वी वेगळे झालो होतो आणि आमचा घटस्फोटही झाला होता. तीरी आमच्यात खूप समजूतदारपणा आहे. आम्हाला मुलेही होती. त्याचवेळी दुसऱ्या मुद्यात त्यांनी मुलांच्या शिक्षणाबाबत प्रश्न उपस्थित केला आहे. कोणी सांगेल का माझी मुले गेल्या ४५ दिवसांपासून शाळेत का जात नाहीत. तुमची मुले शाळेत येत नाहीत अशी पत्रे मला सतत शाळेतून येत आहेत.
https://twitter.com/Nawazuddin_S/status/1632637933575618560?s=20
नवाजुद्दीनने पुढे लिहिले आहे की, “आलियाने माझ्या मुलांना ४ महिन्यांपूर्वी दुबईत सोडले होते. शाळेची फी, वैद्यकीय खर्च आणि प्रवासासाठी ती गेल्या २ वर्षांपासून माझ्याकडून महिन्याला १० लाख रुपये घेत आहे. ती माझ्या मुलांची आई असल्याने तिच्या ३ सिनेमांसाठी मी कोट्यवधी रुपये खर्च केले आहेत. वेळोवेळी तिला आर्थिक मदत केली आहे”. तसेच, त्याने नमूद केले आहे की, माझ्या मुलांना मी आलिशान गाड्या दिल्या होत्या. पण आलियाने त्या गाड्या विकल्या आणि ते पैसे स्वत:साठी खर्च केले. मुलांसाठी मुंबईतील वर्सोवा येथील एका अपार्टमेंटमध्ये मी घर घेतलं होतं. पण आलियाने ते घर विकलं आणि दुसऱ्या एका घरात ती मुलांसोबत भाड्याने राहत आहे. आलियाला फक्त पैशांची गरज आहे आणि पैशांसाठी तिने माझ्यावर वेगवेगळे आरोप केले आहेत”, असे त्याने स्पष्ट केले आहे.
Actor Nawazuddin Siddiqui on Wife and Children’s