India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

मोहित रैनाच्या वैवाहिक आयुष्यात वादळ? अभिनेत्याने डिलिट केले लग्नाचे फोटो

India Darpan by India Darpan
December 23, 2022
in मनोरंजन
0

 

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – कलाकार मग तो छोट्या पडद्यावरील असो वा मोठ्या पडद्यावरील त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल चाहत्यांना नेहमीच फार उत्सुकता असते. त्यांच्या आयुष्यातील आनंदाचे प्रसंग हे चाहत्यांसाठी देखील आनंदाचे असतात. तर दुःखाचे प्रसंग हे काळजी वाढवणारे असतात. बॉलिवूड आणि टीव्ही अभिनेता मोहित रैना सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे. मोहित रैनाच्या खासगी आयुष्याबद्दल सध्या चर्चा सुरू आहे. मोहितचे वैवाहिक आयुष्य बिनसल्याची चर्चा आहे.

मोहितने या वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच जानेवारी २०२२मध्ये अदिती शर्माशी लग्न केलं. पण आता या दोघांमध्ये ‘सारं काही आलबेल’ नसल्याच्या चर्चा आहेत. पत्नीबरोबर वाद असल्याने त्याने इन्स्टाग्रामवरून लग्नाचे फोटो डिलिट केल्याची चर्चा देखील सोशल मीडियावर रंगताना दिसते आहे. वर्षाच्या सुरुवातीला मोहितने अचानक लग्नाचे फोटो शेअर करत चाहत्यांना ही गुड न्यूज दिली होती. पण आता मात्र त्याने लग्नाचे सर्व फोटो डिलिट केले आहेत. एवढंच नव्हे तर लग्नानंतर पत्नीबरोबर शेअर केलेले सगळेच फोटो त्याने डिलिट केले आहेत. त्यामुळे आता ही जोडी विभक्त होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.

मोहित रैनाच्या इन्स्टाग्रामवर पत्नी अदितीसह एकच फोटो आहे. हा फोटो १ जून २०२२ ला पोस्ट केलेला आहे. या फोटोमध्ये मोहितने अदितीला खांद्यावर उचलून घेतलं आहे. हा फोटो पाहून एका युजरने, ”तुम्ही दोघं एकत्र फोटो का पोस्ट करत नाही. मी पाहिलं आहे की तुम्ही एकमेकांना सोशल मीडियावर फॉलो देखील करत नाही आणि लग्नाचे फोटोही डिलिट केले आहेत”, असे म्हटले आहे. सोशल मीडियावर सुरू असलेल्या या चर्चांवर अदिती किंवा मोहितने कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.

मोहित रैनाने लग्नानंतर दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं होतं की, तो एका कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून अदितीला भेटला होता. मोहितनेच अदितीला प्रपोज केलं. काही काळ एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी लग्न केलं. त्याची ‘देवों के देव महादेव’ मालिका बरीच गाजली होती. या मालिकेनेच त्याला स्वतःची वेगळी ओळख दिली होती.

Actor Mohit Raina Deleted Wedding Photos


Previous Post

शाळा, महाविद्यालयातील लैंगिक अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी सरकारने घेतला हा निर्णय

Next Post

इंडिया दर्पण – विचार धन – वाचा आणि नक्की विचार करा

Next Post

इंडिया दर्पण - विचार धन - वाचा आणि नक्की विचार करा

ताज्या बातम्या

या कारणास्तव कोर्टाने पतीला दिला घटस्फोट; पत्नीबाबत कोर्ट म्हणाले…

January 28, 2023

जावई माझा भला! सासूने चार दिवस राबून बनवले तब्बल १७३ पक्वान्न; चर्चा तर होणारच

January 28, 2023
प्रातिनिधीक संग्रहित छायाचित्र

बँकेचा चेक देताना चार वेळा विचार करा! बाऊन्स झाला तर आता होणार ही कठोर कारवाई

January 28, 2023

गर्लफ्रेंडने तुडवले, कंपनीनेही दूर लोटले! ऑस्ट्रेलियाच्या मायकल क्लार्कची जगभरात जोरदार चर्चा

January 28, 2023

इंडिया दर्पण – विचार पुष्प – तुमची प्रगती अखंडपणे चालू राहील

January 28, 2023

डोंबिवलीहून नवी मुंबई आता अवघ्या काही मिनिटांत; पारसिक बोगदा दोन्ही बाजूने खुला

January 27, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group