इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – मराठमोळ्या अभिनेत्री नम्रता शिरोडकर बरोबर लग्न गाठ बांधलेला साऊथचा अभिनेता महेश बाबू हा टॉलिवूडचा प्रिन्स म्हणूनही ओळखला जातो. तो तरुणांच्या गळ्यातील ताईत आहे. तशीच महेश बाबू आणि नम्रता यांची लेक सुद्धा सध्या चर्चेत आहेत. मध्यंतरी या दाम्पत्याची लेक सितारा ही तिच्या मराठीत आरती म्हटल्याने चर्चेत आली होती तर आता ती तिच्यातील टॅलेंटमुळे चर्चेत आली आहे.
आई नम्रता शिरोडकरसारखीच सुंदर आणि बाबा महेशबाबूसारखीच टॅलेंटेड सितारा सध्या जाम चर्चेत आहे. ‘डान्स इंडिया डान्स तेलुगू’ या रिअॅलिटी शोमध्ये महेशबाबू त्याची मुलगी सितारा घट्टामनेनीसोबत पोहोचला. या मंचावर सितारा थिरकताना दिसली. डान्स शोच्या मंचावर लेकीला थिरकताना पाहून महेश बाबूच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता. ‘डान्स इंडिया डान्स तेलुगू’ चा हा एपिसोड झी तेलुगूवर प्रसारित होणार आहे. याचा एक प्रोमो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये महेश बाबू आपल्या मुलीचा हात हातात घेऊन रेड कार्पेटवर चालताना दिसतोय. दोघेही या कार्यक्रम ग्रँड एन्ट्री करतात. सितारा इतर स्पर्धकांबरोबर डान्स करते आणि महेश बाबू आपल्या मुलीला डान्स करताना कौतुकाने बघतो.
मीडिया रिपोर्टनुसार, महेशबाबूने या शोमध्ये येण्यासाठी झी तेलगूसोबत ९ कोटींची डील साईन केली. याचमुळे तो लेकीला सुद्धा सोबत घेऊन आला. पहिल्यांदाच सितारा आणि महेशबाबूंनी अशाप्रकारे स्टेज शेअर केले आहे. महेश बाबूची लेक सितारा मोठी स्टारकिड आहे. सोशल मीडियावरही ती प्रचंड लोकप्रिय आहे. तिचं स्वत:चं इन्स्टाग्राम अकाऊंट आहे. याठिकाणी तिला लाखो लोक फॉलो करतात. महेश बाबूच्या ‘सरकारू वारी पाटा’ या चित्रपटातील एका गाण्यात सितारा दिसली होती. पेनी या गाण्यातही सितारा अतिशय स्टायलिश डान्स मूव्ह करताना दिसली होती.
https://twitter.com/SANDEEPDHFM4/status/1564286998835515392?s=20&t=gZtYuZ1EP1rs3kfyCENMFg
Actor Mahesh Babu Daughter Video Viral
Entertainment Dance Telugu