India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी विमान कंपन्यांमध्ये स्पर्धा; तिकीट झाले स्वस्त, अशा आहेत ऑफर्स

India Darpan by India Darpan
September 4, 2022
in राष्ट्रीय
0
विमानसेवेचे प्रातिनिधीक छायाचित्र

विमानसेवेचे प्रातिनिधीक छायाचित्र


 

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आधुनिक काळात प्रवासाचे अनेक साधने असले तरी प्रत्येकाच्या मनात प्रवास करण्याचे स्वप्न असते. हे स्वप्न पूर्ण झाल्यास प्रत्येकालाच अत्यानंद होतो, कारण हवाई मार्ग तथा आकाश मार्गे प्रवासाची मजा काही औरच असते असे म्हटले जाते.
आता बहुतांश जणांचे हे स्वप्न पूर्ण होऊ शकते. कारण विमान प्रवास आता पूर्वीपेक्षा अधिक स्वस्त झाला आहे. विमानाने पहिला प्रवास करायचा असेल, देशातील पर्यटन स्थळांना भेट देण्यासाठी विमानातून जायचे असेल तर हवाई प्रवासाचे नियोजन करण्यासाठी हीच योग्य वेळ ठरेल. केंद्र सरकारने विमान तिकिट दरावरील मर्यादा हटवल्यानंतर अनेक कंपन्यांनी आपले तिकिट स्वस्त केले आहे. प्रवाशांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी विमान कंपन्यांमध्ये चुरस लागली आहे. त्यात अनेक कंपन्यांनी तिकिट स्वस्ताईचा फंडा अवलंबला आहे. याचा प्रवाशांना सध्यातरी चांगलाच फायदा होत आहे.

कंपन्यांमध्ये लागलेल्या चढाओढीमध्ये प्रवाशांना अनेक ऑफर देण्यात येत आहेत. या ऑफरनुसार, मुंबई ते अहमदाबाद फक्त 1,400 रुपयांमध्ये किंवा मुंबई ते बंगळुरू अवघ्या 2,000 रुपये किंवा त्याहूनही कमी किमतीत उड्डाण करू शकणार आहे. हे आता शक्य झाले आहे, कारण विमान वाहतूक क्षेत्रात स्पर्धा वाढली आहे. या स्पर्धेत प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी विमान कंपन्यांमध्ये किंमत युद्ध सुरू झाले आहे. यापूर्वी विमान कंपन्या ग्राहकांना स्वस्तात तिकिटे देऊ इच्छित होत्या, मात्र सरकारने घातलेल्या मर्यादेमुळे त्यांना ते शक्य होत नव्हते.

विमान प्रवासदरावरील मर्यादा हटवल्यानंतर विमान कंपन्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. यात इंडिगो, स्पाईसजेट, एयर इंडिया, विस्तारा आणि नवीन कंपनी अकासा यांचा समावेश असेल. गेल्या काही काळापासून विमान प्रवाशांची संख्याही वाढली आहे. कोरोनाच्या पूर्वी असलेली प्रवासी संख्या सध्या विमान प्रवास करताना दिसते आहे. त्यामुळे विमान कंपन्यांच्या महसुलातही वाढ झालेली आहे. केंद्र सरकारचा हा निर्णय सकारात्मक ठरेल अशी शक्यता तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत.

विशेषतः प्रवाशांची संख्या आणखी वाढल्यास प्रवाशांच्या तिकिट दरात कपात होण्याची शक्यता आहे. अलीकडच्या विमानभाड्यांवर बारकाईने नजर टाकल्यानंतर आपल्याला तिकीट दरात झालेली मोठी कपात लक्षात येत आहे. सध्या तुम्ही जर गो फर्स्टच्या विमानातून मुंबई ते अहमदाबादचा प्रवास करणार असाल, तर तुमच्या या प्रवासासाठी तिकिटाची किंमत अवघी 1,399 रुपये एवढीच आकारली जाणार आहे. याच मार्गावर 9 सप्टेंबरच्या प्रवासासाठी Akasa Air कंपनीचे विमान तिकिट 1,497 रुपये इतके आहे. इंडिगो ही देशांतर्गत सर्वात मोठी विमान कंपनी या मार्गावर 1,609 रुपये इतकी तिकिट ऑफर देत आहे.

मुंबई ते बंगळुरूचा विमान प्रवासही चांगलाच स्वस्त झाला आहे. या मार्गावर 2,000 ते 2,200 रुपयांच्या श्रेणीत तिकिट उपलब्ध करण्यात आले आहे. Akasa Air ही नवी विमान कंपनी या मार्गावर 9 सप्टेंबरच्या प्रवासासाठी 1,997 रुपयांचे तिकिट ऑफर करत आहे, तर इंडिगोचे तिकीट 2,208 रुपयांमध्ये उपलब्ध आहे.

नागरी उड्डाण मंत्रालयाने 31 ऑगस्टपासून विमान तिकिट दरावरील मर्यादा हटवली आहे. त्यानंतर भारतीय विमान कंपन्यांमध्ये किंमत युद्ध सुरु होईल, अशी अपेक्षा होती. तसेच चित्र सध्या देशांतर्गत विमान मार्गावर दिसत आहे. केंद्र सरकारच्या निर्णयानंतर विमान कंपन्यांमध्ये स्पर्धा वाढली आहे. त्यांच्यातील स्पर्धेचा देशांतर्गत विमान प्रवाशांना मोठा फायदा होऊ शकतो. अनेक विमान कंपन्या प्रवाशांच्या मागणीनुसार सूट देऊ शकतात, असा अंदाज हवाई प्रवास क्षेत्रातील तज्ज्ञांनी वर्तवला आहे.

सर्वसामान्यांच्या मनात एकदा तरी विमानाने प्रवास करण्याची इच्छा असते. परंतु अनेकवेळा विमानाचे तिकीट परवडत नाही किंवा येत्या काही महिन्यात विमान प्रवास करणार असाल तर आताच तुमची तिकीटे बुक करा. एअर एशिया इंडियासह अनेक विमान कंपनी विमान प्रवाशांसाठी स्वस्त स्वस्त करण्याची अपेक्षा आहे. याबाबत केंद्र सरकारने आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत. भारतातून व्यवसाय , शिक्षणासह पर्यटानासाठी परदेशात प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. कारण अगदी कमी वेळात जगाच्या एका कोपऱ्यातू दुसऱ्या कोपऱ्यात पोहोचायचे असल्यास हवाई मार्ग हा सर्वोत्तम पर्याय आहे. तरी भारतीयांचा हाच देशांतर्गत प्रवासाबरोबर आंतरराष्ट्रीय हवाई प्रवास स्वस्त होणार असल्याची शक्यता आहे.

Air Tickets Offers Competition Passengers Cheaper Rates
Aviation Airlines


Previous Post

रिलायन्स जिओला सहा वर्षे पूर्ण: अशी आहे कंपनीची आजवरची वाटचाल; वाचून तुम्ही थक्कच व्हाल!

Next Post

साऊथ अभिनेता महेश बाबूच्या लेकीचा हा व्हिडिओ पाहिला का? सोशल मिडियात प्रचंड व्हायरल

Next Post

साऊथ अभिनेता महेश बाबूच्या लेकीचा हा व्हिडिओ पाहिला का? सोशल मिडियात प्रचंड व्हायरल

ताज्या बातम्या

प्रातिनिधीक संग्रहित फोटो

टीम इंडिया आशिया चषकासाठी पाकिस्तानात जाणार? बीसीसीआयची ही आहे भूमिका

February 7, 2023
प्रातिनिधीक छायाचित्र

नव्या शैक्षणिक धोरणात इयत्ता दहावीवर हा सुरू आहे अभ्यास; शिक्षणमंत्री म्हणाले…

February 7, 2023

सिद्धार्थ-कियारा आज अडकणार लग्नबंधनात; दोघांनी इतक्या कोटींना घेतले नवे घर

February 7, 2023

गानकोकिळा लता मंगेशकर यांचे स्वप्न होणार पूर्ण; मंगेशकर कुटुंब नाशकात सुरू करणार वृद्धाश्रम

February 7, 2023

उर्फी जावेदला नेटकऱ्यांनी असे ट्रोल केले…. अखेर उर्फीने व्हिडिओच केला ट्रोल

February 7, 2023

अभिनेत्री अरुणा इराणी यांनी लग्नाबाबत प्रथमच केला हा मोठा खुलासा

February 7, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group