इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – साऊथ सुपरस्टार महेश बाबूचा भाऊ आणि अभिनेता नरेश हा त्याच्या लग्नामुळे कायम चर्चेत आहे. नरेश हा महेश बाबूचा सावत्र भाऊ आहे. आतापर्यंत त्याने तीन लग्न केली आहेत. काही काळापासून तो अभिनेत्री पवित्रा लोकेशसोबतच्या अफेअरमुळे प्रकाशझोतात आला आहे. आता खुद्द नरेशनेच आपल्या या नात्याची कबुली दिली आहे. पवित्रासोबत लवकरच लग्न करणार असल्याचं त्याने जाहीर केलं आहे. नरेशने नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत ट्विटरवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. यामध्ये तो पवित्रासोबत दिसत आहे. याच व्हिडीओच्या माध्यमातून त्याने पवित्राशी लग्न करणार असल्याचं म्हटलंय.
कलाकारांचं व्यक्तिगत आयुष्य हे कधीच त्यांच्यापुरतं मर्यादित राहत नाही. त्यांच्या कुटुंबासह त्यांचे चाहते हा त्यांचा वाढीव परिवार असतो. याशिवाय त्यांचे टीकाकारही याच परिवाराचा भाग असतात. त्यामुळेच त्यांच्या खासगी आयुष्यातील कोणतीही गोष्ट लपून राहत नाही. तसंच काहीसं अभिनेता नरेश याच्याबाबत घडलं आहे. अभिनेता नरेश बाबू हा आपल्या लग्नांबाबत कायम चर्चेत आला आहे.
आतापर्यंत त्याने लग्न करून आपल्या तिन्ही बायकांबरोबर घटस्फोट घेतला आहे. आणि आता त्याने अभिनेत्री पवित्रा सोबतच्या नात्याची कबुली दिली आहे. सोशल मीडियावर पोस्ट केलेला हा व्हिडीओ चांगलाच चर्चेत आहे. कँडल, केक आणि खिडकीबाहेर नववर्षानिमित्त आतषबाजी.. असा रोमँटिक माहौल या व्हिडीओत दिसतोय. यामध्ये नरेश आणि पवित्रा एकमेकांना केक भरवताना दिसत आहेत. यानंतर दोघं लिपलॉक करतानाही दिसतात. यासोबतच नवीन वर्ष, नवी सुरुवात.. तुम्हा सर्वांच्या आशीर्वादाची गरज आहे. आमच्याकडून तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा’, असं कॅप्शन देत नरेशने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये आधी नवीन वर्षाच्या शुभेच्छा आणि त्यानंतर ‘लवकरच लग्न करणार आहोत’ असं लिहिलेलं दिसतं.
https://twitter.com/ItsActorNaresh/status/1609067421507407873?s=20&t=uHd_fNxXfWo5UIB1lqPx-Q
नरेश बाबू हा तेलुगू चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आहे. बालकलाकार म्हणून त्याने करिअरची सुरुवात केली होती. नरेश त्याच्या खासगी आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत राहिला. आता तर त्याच्या या चौथ्या लग्नाबाबत ऐकून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
Actor Mahesh Babu Brother Marriage Fourth Time
Telugu Actor Naresh Babu