इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – चित्रपटसृष्टीत काही जोड्यांची नेहमी चर्चा असते. अमिताभ बच्चन – जया बच्चन ही त्यातली लोकप्रिय जोडी. आता याच रांगेत एक नवीन जोडी ऍड झाली आहे. ही जोडी भलतीच हिट आहे. ही नवीन जोडी आहे रितेश देशमुख – जेनिलिया देशमुख यांची. सध्याची ही अत्यंत हिट आणि लाडकी जोडी आहे.
रितेश देशमुख आणि जेनिलिया कलाविश्वातील लोकप्रिय कपल आहेत. सध्या त्यांचा नवीन ‘वेड’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटात दोघांच्याही भूमिका आहेत. ३० डिसेंबरला प्रदर्शित झालेल्या या जोडीच्या चित्रपटाने प्रेक्षकांनाही वेड लावलं आहे. रितेश आणि जेनिलिया सध्या ‘वेड’ चित्रपटाचं जोरदार प्रमोशन करत आहेत. या चित्रपटाने प्रेक्षकांना वेड लावलं असून चाहते चित्रपटगृहांत गर्दी करत आहेत.
या प्रमोशनदरम्यान ठिकठिकाणी रितेश – जेनिलिया यांच्या अनेक मुलाखती सुरू आहेत. त्यांच्या मुलाखतीचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. अशाच एका मुलाखतीदरम्यान रितेशने जेनिलियासाठी खास उखाणा घेतला. त्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होतो आहे. मुलाखतीत आग्रह केल्यानंतर रितेशने टिपिकल मराठी उखाणा घेतला. “भाजीत भाजी मेथीची, जेनिलीया माझ्या प्रितीची”, असा खास उखाणा रितेशने तिच्यासाठी घेतला आहे. त्याच्या या व्हायरल व्हिडीओवर चाहत्यांनी कमेंटही केल्या आहेत.
रितेश – जेनिलिया ‘वेड’ चित्रपट प्रदर्शनाच्या दिवसापासूनच कोटींची कमाई करत आहेत. या चित्रपटाद्वारे रितेशने दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल ठेवलं आहे. तर जेनिलियाचा हा पहिलाच मराठी चित्रपट आहे.
Riteish Deshmukh Ukhana for Genelia Video
Entertainment