मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – दक्षिणेतील सुपरहिट अभिनेता धनुष आणि त्याची पत्नी ऐश्वर्या यांनी लग्नानंतर दीर्घकाळ संसार केल्यावर ते आता वेगळे झाले आहेत. तसेच दोघांनी संयुक्त निवेदन जारी करून घटस्फोटाची माहिती जाहीरपणे सार्वजनिक केली आहे. परंतु कामाच्या व्यापातून धनुष आपल्याला व मुलांना वेळ देत नसल्याने आपण गेले अनेक दिवस नाराज होतो, असे ऐश्वर्या हिने स्पष्ट केले आहे. तसेच आता त्यांच्या मुलांची जबाबदारी कोण घेणार? याची चर्चा सुरू आहे.
ऐश्वर्या ही सुपरस्टार रजनीकांत यांची मुलगी असून तिचे अभिनेता धनुष सोबत सन २०१४ मध्ये लग्न झाले होते. धनुष आणि ऐश्वर्याने १८ वर्ष जुने वैवाहिक नाते तोडले! आता असे काय घडल? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. याबाबत खुद्द धनुषने सोशल मीडिया पोस्टद्वारे ही माहिती दिली आहे. खरे म्हणजे दोघांमध्ये तणावाची बातमी कधीच आली नव्हती, अशा परिस्थितीत त्यांच्या अचानक घटस्फोटाचा चाहत्यांना धक्का बसला. सुपरस्टार धनुषने सोशल मीडियावर पत्नी ऐश्वर्या आर धनुषपासून विभक्त झाल्याबद्दल सोशल मिडीयावरून सांगितले आहे. त्यांच्या घटस्फोटाची ही बातमी समोर आल्यानंतर अनेक जणांनी दु:ख व्यक्त केले. धनुषने सोशल मीडियावर एक निवेदन प्रसिद्ध करून ही माहिती दिली आहे.
एका रिपोर्टनुसार, धनुष कामात खूप व्यस्त होता. तो अनेकदा शूटिंगसाठी बाहेर असायचा आणि ऐश्वर्याला वेळ देऊ शकत नव्हता. या गोष्टींमुळे दोघांमध्ये तणाव वाढू लागला. लग्नानंतर धनुषने खूप काम करायला सुरुवात केली होती, अनेक वेळा धनुषने कामामुळे त्यांच्या नात्याकडे लक्ष दिले नाही, ज्यामुळे दोघांमधील अंतर वाढू लागले. दोघांचे संबंध चांगले नसताना धनुषनेही चित्रपट साइन केले. मात्र, विभक्त होण्यापूर्वी दोघांनी खूप चर्चा केल्याचीही माहिती समोर आली आहे.
धनुष आणि ऐश्वर्या लग्नाच्या दिड तपानंतर वर्षानंतर एकमेकांपासून वेगळे झाले आहेत. त्यांना यात्रा आणि लिंगा असे दोन पुत्र आहेत. आता मुलांचा ताबा घेण्याचा प्रश्न आहे, त्याबाबत अद्याप काहीही स्पष्ट झालेले नाही. मात्र, दोघांनी मिळून मुलांचे संगोपन करण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.