नाशिक – दुचाकीच्या अपघातात जखमी झालेल्या महिलेचे निधन
नाशिक – भगूरला जात असतांना लहवित रोड वर दुचाकीच्या अपघातात जखमी झालेल्या महिलेचे निधन झाले. सरस्वती राहूल शिंगाडे (वय २१, शेणीत इगतपुरी) असे मृत महिलेचे नाव आहे. गुरुवारी पाऊणच्या सुमारास शेणीतहून भगूरला जात असतांना दुचाकीच्या अपघातात त्या जखमी झाल्या. त्यांना कॅन्टोन्मेंट हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले होते. डॉ. कानडे यांनी मृत घोषीत केले. याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.
दारुच्या नशेत नदीकिनारी एकाचा मृत्यु
नाशिक – नदीकिनारी दारुच्या नशेत असलेल्या एकाचा मृत्यु झाला आहे. विठ्ठल निंबा पवार (वय ६०, गिते मळा, मुंबई नाका) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. पवार गुरुवारी रात्री आठच्या सुमारास मुंबई नाका परिसरातील गिते मळा भागातील त्याच्या राहत्या घराजवळ दारुच्या नशेत बेशुध्द अवस्थेत होते. त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता, डॉ. बोरा यांनी मृत घोषीत केले. याप्रकरणी मुंबई नाका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली.
घरफोडीच्या संशयावरुन पोलिसांनी एकाला केली अटक
नाशिक – बोरगड शिवारात शिवयोग सोसायटी परिसरात घरफोडीच्या संशयावरुन पोलिसांनी एकाला अटक करण्यात आली बाळा देवराम पारधी (धोंडेगाव गिरणारे) असे संशयिताचे नाव आहे. गणेश सुदाम रहेरे (वय ४०, ) यांच्या तक्रारीवरुन म्हसरुळ पोलिस ठाण्यात संशयिता विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेली माहीती अशी गुरुवारी (दि१३) रात्री सव्वा अकराच्या सुमारास बोरगड शिवारातील शिवयोग सोसायटी परिसरात संशयित रात्री घरफोडीच्या संशयावरुन फिरत असतांना पोलिसांनी त्याला अटक केली.