नाशिक : भरधाव अज्ञात वाहनाने धडक दिल्याने ४० ते ४५ वयोगटातील अनोळखी पुरूष ठार झाला. हा अपघात मुंबई आग्रा महामार्गावरील शेरे पंजाब हॉटेल समोर झाला. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.
हॉटेल मालक कुलदिपसिंग राजपूत यानी याबाबत खबर दिली आहे. शुक्रवारी (दि.३) सायंकाळच्या सुमारास हा अपघात झाला. रस्त्याने पायी जाणाºया अनोळखी पुरूषास नाशिककडून ओझरच्या दिशेने भरधाव जाणा-या अज्ञात वाहनाने धडक दिली. या अपघातात अनोळखी पादचारी जागीच ठार झाला. चालक आपल्या वाहनासह पसार झाला असून याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास जमादार पाटील करीत आहेत