शुक्रवार, मे 16, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

साहित्य संमेलन : जीवनाच्या सर्वांगाला स्पर्श करणारी भाषा म्हणजे ‘गझल’- डॉ. दिलीप पांढरपट्टे

by India Darpan
डिसेंबर 4, 2021 | 3:34 pm
in इतर
0
IMG 20211204 WA0169 1

नाशिक – जीवनातील प्रत्येक प्रसंग व विषय गझलेच्या माध्यमातून व्यक्त करता येत असतो. त्यामुळे गझल ही एक जीवनाच्या सर्वांगाला स्पर्श करणारी भाषा आहे, असे माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव तथा महासंचालक, गझलकार डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी गझलकट्टा या कार्यक्रमात गझलेचे वर्णन केले आहे.

९४ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या गझलकट्टा कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी अँटी करप्शन ब्युरोचे पोलिस अधीक्षक सुनिल कडासने, संमेलनाचे कार्याध्यक्ष हेमंत टकले, संमेलन समन्वयक समीर भुजबळ, निमंत्रक व प्रमुख कार्यवाह जयप्रकाश जातेगांवकर, संमेलनाच्या सर्व समित्यांचे मुख्य समन्वयक विश्वास ठाकुर, विनायक रानडे, कवी नरेश महाजन, गझलकार कमलाकर आबा देसले, खलील मोमीन, अरुण सोनवणे यांच्यासह रसिक प्रक्षेक उपस्थित होते.

सचिव गझलकार डॉ. पांढरपट्टे गझल व कवितेतील फरक सांगतांना म्हणाले की, एका कवितेमध्ये एकाच विषयाचा समावेश असतो तसे गझलमधील प्रत्येक शेर हा वेगळा असतो. रसिकांना समजेल अशा सोप्या व सरळ भाषेत गझल असावी. गझलची निर्मिती ही उर्दु भाषेमध्ये झाली असली तरी मराठी भाषेतील गझलचा प्रवास सुरेश भट यांनी सुरू केला. सुरेश भट यांच्यासोबत पत्रामार्फत झालेला पहिला संवाद, ‘तुला जर चांगले मार्गदर्शन मिळाले तर तू एक उत्तम गझलकार होशील. तुझा चाहता -सुरेश भट’ हा अनुभव देखील डॉ. पांढरपट्टे यांनी यावेळी कथन केला. सुरेश भट यांनी समोरच्या साहित्यिकातील क्षमता ओळखून त्यांना लिहिण्यासाठी मार्गदर्शन केले आहे, असेही गझलकार डॉ. पांढरपट्टे यांनी यावेळी सांगितले.

उडवाच मान माझी, माझा नकार नाही.
इतकीच शर्त आहे, मी वाकणार नाही….
डॉ. पांढरपट्टे यांनी सादर केलेल्या या गझलेस प्रक्षेकांनी भरभरून दाद दिली.
गझलमंचच्या उद्घाटनानंतर सचिव तथा महासंचालक डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी अभिजात मराठी भाषा दालनास भेट दिली. तसेच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा बहाल करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांतर्गत महामहीम राष्ट्रपती यांना देण्यात येणारे पत्र ही त्यांनी टपाल पेटीत टाकले.

सौंदर्याची अभिव्यक्ती म्हणजे गझल : सुनिल कडासने
प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले पोलिस अधीक्षक सुनिल कडासने म्हणाले, समृद्ध व सुदृढ समाज घडविण्यासाठी संत साहित्याच्या माध्यमातून तयार झालेला भक्ती संप्रदाय प्रेरक ठरत आहे. जगामध्ये भारत असा एकमेव देश आहे ज्याने सर्व धर्मांचा व त्यांच्या सांस्कृतिचा स्विकार केला आहे. हे उर्दु गझलच्या रुपाने अनुभवास मिळते. गझलेच्या जन्माचा प्रवास सांगतांना ते म्हणाले, सौंदर्याची अभिव्यक्ती म्हणजे गझल आहे. यावेळी त्यांनी रसिक प्रेक्षकांसमोर गझल सादर केल्या. गझलमंचच्या पहिल्या सत्रात कमलाकर आबा देसले, खलील मोमीन व अरूण सोनवणे यांनी आपल्या गझल सादर केल्या.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

मुंबई – आग्रा महामार्गावर भरधाव अज्ञात वाहनाच्या धडकेत एक ठार

Next Post

MPSC च्या विविध स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक जाहीर 

Next Post
mpsc 650x375 1

MPSC च्या विविध स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक जाहीर 

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींना छुपे विरोधक त्रास देतील, जाणून घ्या, शुक्रवार, १६ मेचे राशिभविष्य

मे 15, 2025
नव्या ३ हजार बसेस खरेदीच्या अनुषंगाने बैठक 1 1024x683 1

सुरक्षित प्रवासासाठी एसटीच्या ‘स्मार्ट बस’ येणार….या असणार आधुनिक सुविधा

मे 15, 2025
crime 13

इमारतीच्या पाईपमधील चोकअप काढून दोरीच्या सहाय्याने जमिनीवर उतरत असतांना कामगाराचा मृत्यू

मे 15, 2025
image001CDNU

डॉ.अजय कुमार यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली…

मे 15, 2025
राज्य

राज्य आपत्ती कार्य केंद्रास अमेरिकन वाणिज्य दूतावासाच्या शिष्टमंडळाची भेट…

मे 15, 2025
DCM 2 1140x570 1 e1739778220155

राज्य शासनासोबत मर्सिडीज-बेंझ इंडियाची समृद्धी महामार्गावरील रस्ता सुरक्षा भागीदारी….

मे 15, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011