नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – औरंगाबादरोडवरील लाखलगाव शिवारात भरधाव दुचाकीने धडक दिल्याने ६२ वर्षीय वृध्द ठार झाला. रामकृष्ण विठ्ठल खैरनार (रा.लाखलगाव ता.जि.नाशिक) असे दुचाकीच्या अपघातात मृत्यू झालेल्या वृध्दाचे नाव आहे. याप्रकरणी अज्ञात पल्सरस्वाराविरूध्द आडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खैरनार रविवारी मनोज मोडक यांच्या शेत गट क्र.२१ येथे गेले होते. औरंगाबाद रोडने नाशिकच्या दिशेने पायी जाणारी दिंडी बघण्यासाठी रस्त्याच्या कडेला थांबले असता हा अपघात झाला. ओढ्याकडून लाखलगावच्या दिशेने भरधाव जाणाºया एमएच १५ एचडी ५०१४ या दुचाकीने त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात खैरनार यांच्या डोक्यास वर्मी मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाला असून पल्सरस्वार आपल्या वाहनासह पसार झाला आहे. याबाबत मुलगा विशाल खैरनार यांनी दिलेल्या खबरीवरून आडगाव पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक हेमंत तोडकर करीत आहेत.