अजय सोनवणे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
येवला- नाशिक महामार्गावरील येवला तालुक्यातील देशमाने शिवारामध्ये एसएनडी महाविद्यालयाची स्कूल बस व छोटा हत्ती या वाहनांमध्ये अपघात झाला. या अपघातात छोटा हत्तीतील दोन जण गंभीरित्या जखमी झाले असून स्कूल बस मधील शालेय विद्यार्थी सुखरूप आहेत. महामार्गावर साईट पट्ट्याचे काम चालू असल्याने एका बाजूने वाहतूक वळवण्यात आली होती. यावेळी या दोन्ही वाहनांची समोर समोर अपघात होऊन या अपघातात छोटा हत्ती मधील दोन जण जखमी झाले आहे. छोटा हत्ती वाहन येवल्याच्या दिशेने विंचूरला कांदे घेऊन चालला होता तर स्कूल बस ही विंचूच्या दिशेने येवल्याकडे येत असताना अपघात झाला.