नाशिक – निवडणुकीसाठी जात प्रमाणपत्र जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती येथून मंजूर करुन देण्यासाठी खासगी इसम गणेश बाबुराव घुगे यांनी ७० हजार रुपयाची लाचेची मागणी केल्याप्रकरणी लाच लुचपत प्रतिबंध विभागाने गुन्हा दाखल केला आहे. घुगे खासगी वाहक चालक असून त्याने कार्यालयाच्या आवारात ही लाच स्विकारली. त्यावेळी एसीबीने लावलेल्या सापळ्यात तो अलगद अडकला. त्यांच्याविरुध्द भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमान्वये मुंबई नाका पोलिस स्थानकात लाच लुचपत प्रतिबंध विभागाने गुन्हा दाखल केला आहे. घुगे हा सिडको येथे पवन नगर येथे राहणार आहे. नासर्डी पुलाजवळ असलेल्या सामाजिक न्याय विभागाच्या आवारात घुगे याला रंगेहाथ पकडण्यात आले. त्याची अनेक वरीष्ठ अधिका-यांची ओळख असून ती आता समोर येणार आहे. घुगे याला रंगेहाथ पकडल्यामुळे जात प्रमाणपत्रचे रॅकेटच बाहेर येणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे अनेक अधिका-यांचे धाबे दणाणले आहे.