जळगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नातेवाईकां विरुध्द दाखल गुन्हामध्ये यातील तकारदार व त्यांचे नातेवाईक यांना अटक न करण्यासाठी ८ हजार लाचेची घेतांना जळगाव जिल्हयातील पारोळा येथील पोलीस उपनिरीक्षक जयवंत प्रल्हाद पाटील हे लाच लुचपत प्रतिबंध विभागाच्या जाळ्यात सापडले आहे.
या कारवाईबाबत एसीबीने दिलेली माहिती अशी की, तक्रारदार यांचे कडेस ३० हजार रुपयांची मागणी करून या अगोदर २० हजार रुपये घेतले व उर्वरित १० हजार रुपये नंतर घेवून या असे सांगितले. त्यानंतर आज रोजी पाटील यांनी पंचा समक्ष १० हजार रुपयाची लाचेची मागणी करून तडजोडअंती ८ हजार रुपये स्वतः स्विकारतांना त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. त्यांचे वर पारोळा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सापळा कारवाई
युनिट – जळगाव.
तक्रारदार- पुरुष,वय- 42 रा. अंचाळे ता.जि.धुळे
आलोसे- जयंवत प्रल्हाद पाटील, वय 54, श्रेणी पोलीस उप निरी. नेम. पारोळा पोलीस स्टेशन जि.जळगाव. वर्ग-2
*लाचेची मागणी- 10000/-
*लाच स्विकारली- 8000/ रुपये
*हस्तगत रक्कम- 8000/-रुपये
- लाचेचे कारण – यातील तक्रारदार यांचेवर व त्यांचे नातेवाईकावर पारोळा पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजि. नंबर 344/2023 भादवि कलम 324,323,341,342, 427,504,506,34 प्रमाणे दि.12/08/2023 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हामध्ये यातील तकारदार व त्यांचे नातेवाईक यांना अटक न करण्यासाठी तसेच न्यायालयात दोषारोप पत्र लवकरात लवकर पाठविल्यासाठी यातील तक्रारदार यांचे कडेस 30000/ रुपयांची मागणी करून या अगोदर 20000/ रुपये घेतले व उर्वरित 10000/ रुपये नंतर घेवून या असे सांगितले. त्यानंतर आज दि.12/09/2023 रोजी यातील आलोसे यांनी पंचा समक्ष 10000/हजाराची मागणी करून तडजोडअंती 8000/ स्वतः स्विकारतांना त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. त्यांचे वर पारोळा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात येत आहे.
हॅश व्हॅल्यू घेण्यात आली आहे.
*सापळा पर्यवेक्षण अधिकारी
श्री.सुहास देशमुख,
पोलिस उप अधीक्षक,ला.प्र.वि. जळगांव. मोबा.नं.880664300
*सापळा व तपास अधिकारी
एन. एन . जाधव,पोलिस निरीक्षक
,ला.प्र.वि. जळगांव. मोबा.नं.8691824333
सापळा पथक
पो.ना. बाळू मराठे, पो.कॉ. अमोल सुर्यवंशी, पो.कॉ. सचिन चाटे
*कारवाई मदत पथक- अमोल वालझाडे, पोलीस निरीक्षक
स. फौ. दिनेशसिंग पाटील स.फौ.सुरेश पाटील, पो.ह.रविंद्र घुगे,म.पो.हे.कॉ. शैला धनगर, पो.ना.किशोर महाजन, पोना सुनिल वानखेडे,पो.कॉ. प्रदीप पोळ,पो.कॉ. राकेश दुसाने, पो. कॉ. प्रणेश ठाकुर