मनमाड – येथे घराचे छतावरील विद्युत वाहक तारा काढण्यासाठी महावितरणच्या खासगी कंत्राटदार याने २० हजार रुपयाची लाच घेतल्याप्रकरणी लाच लुचपत विभागाने रंगेहाथ पकडले. तर या कंत्राटदाराला मदत करणा-या सहाय्यक अभियंत व आणखी एक खासगी कंत्राटदार यांचा सहभाग असल्यामुळे या तिघांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.
याबाबतची सविस्तर माहिती लाच लुचपत प्रतिबंध विभागाने दिली आहे.
*यशस्वी सापळा
▶️ *युनिट – नाशिक.
▶️ *तक्रारदार- पुरुष,वय- ३५ वर्ष,
रा.मनमाड़, जि.नाशिक.
▶️ *आलोसे-
१) महेंद्र श्रावण चव्हाण, वय- ३७ वर्ष, सहायक अभियंता, ( म. रा. वि. वि. मर्या. रा. नवकार रो हाउस नंबर ६, शरयू पार्क -२, जत्रा होटेल जवळ, अंबिका साड़ी सेंटर मागे, आडगाव, नाशिक
२) कुणाल दादा ठाकरे, वय- ३० वर्ष,
धंदा- खाज़गी कंत्राटदार, रा. शिक्षक कॅालनी, ता. मनमाड, नाशिक ( खाज़गी इसम )
३) अंकुश मोठाभाऊ डुकळे, वय- २९ वर्ष, धंदा- खाज़गी कंत्राटदार, रा. मु. पो. झाडी, ता. मालेगांव, जिल्हा – नाशिक ( खाज़गी इसम )
▶️ *लाचेची मागणी-* २०,०००/- रु.
▶️ *लाच स्विकारली-* २०,०००/-रु.
▶️ *हस्तगत रक्कम-* २०,०००/-रू.
▶️ *लाचेची मागणी -*
दि.10/06/2022 व दि.
13/06/22
▶️ *लाच स्विकारली-
दि.22/06/2022
▶️ *लाचेचे कारण –
तक्रारदार यांचे घराचे छतावरील पाईपास ३३ के. वि. ची बंदस्थितिल विद्युत वाहक तारा अनधिकृतपणे बांधल्या होत्या त्या काढणेकामी तक्रारदार यांनी आलोसे यांच्या कार्यालयात अर्ज केला होता. आलोसे यांनी कायदेशिर बाबिंची पूर्तता न करता त्यांचे मर्जितिल खाज़गी कंत्राटदार नेमले. खाज़गी कंत्राटदार यांनी तक्रारदार यांचेकडे सदरकामी २०,०००/- रूपये पंचासमक्ष मागणी केली. व आलोसे यांनी सदरकामी
पंचासमक्ष खाज़गी कंत्राटदार यांना प्रोत्साहन दिले.
सदर लाचेची रक्कम खाज़गी कंत्राटदार क्रमांक ०२ यांनी स्वतः पंचासमक्ष तक्रारदार यांचे दुकानात, मनमाड़ येथे स्वीकारली म्हणून गुन्हा. ▶️ हॅश व्हॅल्यू घेण्यात आली असून फोटोग्राफ घेण्यात आले आहेत.
▶️ *तपास अधिकारी-*
श्री.संदीप घुगे, पोलीस निरीक्षक, अँन्टी करप्शन ब्युरो, नाशिक.
▶️ *सापळा व मदत पथक-*
PI गायत्री जाधव, पो. हवा.बाविस्कार, पो. हवा. प्रफुल्ल माळी, पो.ना. प्रकाश महाजन, चापोना- परशुराम जाधव.
▶️ *मार्गदर्शक-*
*1)* मा.श्री.सुनिल कडासने सो, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक
*2)* मा.श्री.एन.एस.न्याहळदे, साो., अप्पर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक.
*3)* मा.श्री. सतीश डी.भामरे, साो., वाचक पोलीस उप अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक.
▶️ *आरोपीचे सक्षम अधिकारी-*
मा.मुख्य अभियंता, म. रा. वि. वि. कं. मर्या.
—————————–
*सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून *देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधावा.
*अँन्टी करप्शन ब्युरो नाशिक*
*@ टोल फ्रि क्रं. 1064*
==================