मंगळवार, जून 17, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

… म्हणून मोडला अभिषेक बच्चन आणि करिष्मा कपूरचा साखरपुडा

by India Darpan
नोव्हेंबर 27, 2022 | 5:21 am
in मनोरंजन
0
DNBjCUXUMAAv735

 

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – बॉलीवूडमध्ये दररोज अनेक जोड्या तयार होतात आणि मोडतातही. काहींच्या जोड्या चाहत्यांच्या मनात असतात तर त्यातील काही चर्चेत असतात. अशीच एक चर्चेतील जोडी म्हणजे अभिषेक बच्चन – करिष्मा कपूर. मात्र, ही जोडी काही प्रत्यक्षात येऊ शकली नाही. या जोडीचा साखरपुडा झाला पण लग्न काही झाले नाही. लग्न मोडण्याची अनेक कारणे आजवर समोर आली आहेत. आता पुन्हा एकदा एका नवीन कारणाने ही चर्चा सुरू झाली आहे.

बॉलीवूडमधील काही लव्ह-स्टोरी लग्नापर्यंत पोहोचल्या, तर काही त्याआधीच संपल्या. अभिषेक बच्चन आणि करिश्मा कपूर यांची जोडी ही त्यातलीच. या दोघांचं अफेअर सर्वश्रुत होतं. त्यांचा साखरपुडा झाला होता आणि दोघं लग्नसुद्धा करणार होते. मात्र नंतर असं काहीतरी घडलं की कपूर आणि बच्चन कुटुंबीयांमधील हे नातंच तुटलं. हे घडून गेलं, आणि मुळात आता दोघेही त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात सुखी आहेत. तरीही आज एवढ्या वर्षांनंतरही अभिषेक-करिश्माचा साखरपुडा का मोडला, हा प्रश्न अनुत्तरितच राहिला.

दिग्दर्शक सुनील दर्शन यांनी एका मुलाखतीत अभिषेक बच्चन आणि करिश्मा कपूर यांच्या तुटलेल्या नात्याविषयी खुलासा केला. अभिषेक आणि करिश्माने २००० मध्ये जवळपास पाच वर्षे एकमेकांना डेट केलं होतं. लग्नाचा निर्णय तर झाला होता, आणि या दोघांचा साखरपुडासुद्धा झाला होता. मात्र त्यानंतर हे नातं तुटलं. सुनील दर्शन यांनी २००० मध्ये ‘हां मैने भी प्यार किया’ या चित्रपटासाठी दोघांसोबत काम केलं होतं. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अभिषेक – करिश्मामधली जवळीक वाढली होती.

‘बॉलिवूड हंगामा’ला दिलेल्या मुलाखतीत सुनील दर्शन म्हणाले, “अभिषेक – करिश्माचे नाते हे सत्य होतं. ते दोघं लग्न करणार होते. मी त्यांच्या साखरपुड्याला देखील उपस्थित होतो. पण, तरीही या दोघांचं नातं फार काळ टिकणार नाही, असे मला वाटत असल्याचे दर्शन यांनी सांगितले. “अभिषेक आणि करिश्मा हे सेटवर नेहमीच भांडायचे. या दोघांची जोडी ‘मेड फॉर इच अदर’ अशी नव्हती. सतत त्यांच्यात भांडणं व्हायची. मला नेहमीच प्रश्न पडायचा की खरंच हे दोघं एकमेकांसाठी बनले आहेत का? अभिषेक आणि करिश्मा या दोघांचा स्वभाव फार चांगला आहे, पण ते दोघेही एकमेकांसाठी नाहीत, असेही सुनील सांगतात.
करिश्मा आणि अभिषेक सध्या आपापल्या आयुष्यात व्यस्त आहेत. अभिषेकने ऐश्वर्या रायशी लग्न केलं. या दोघांना आराध्या ही मुलगी आहे. तर करिश्माने व्यावसायिक संजय कपूरशी लग्न केलं होतं. २०१६ मध्ये या दोघांचा घटस्फोट झाला. करिश्मा आणि संजय यांना दोन मुलं आहेत.

Abhishek Bacchan and Karishma Kapoor Engagement Broken

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

महिलांची ‘टिकली’ पुन्हा चर्चेत; आता हे आहे निमित्त

Next Post

मधाचा मोहोळ काढण्याच्या नादात १२ वर्षीय बालकाचा विहिरीत पडून दुर्दैवी मृत्यू

Next Post
IMG 20221127 WA0041 e1669524134868

मधाचा मोहोळ काढण्याच्या नादात १२ वर्षीय बालकाचा विहिरीत पडून दुर्दैवी मृत्यू

ताज्या बातम्या

Sudhakar Badgujar

भाजपमध्ये पक्षप्रवेश करण्यासाठी सुधाकर बडगुजर हजारो कार्यकर्त्यांसह मुंबईला रवाना, पण, प्रदेशाध्यक्षांच्या विधानामुळे संभ्रम

जून 17, 2025
Untitled 46

नवी दिल्लीत आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्सची पहिली बैठक…झाले हे निर्णय

जून 17, 2025
rohini khadse e1712517931481

समृद्धी महामार्गावर वाहनांवर दगडफेक, लुटमार करण्याच्या घटना…रोहिणी खडसे यांनी व्हिडिओ शेअर करत केले ट्विट

जून 17, 2025
WhatsApp Image 2025 06 16 at 7.32.53 PM 1920x1280 1

नवीन शैक्षणिक वर्ष प्रारंभ…पहिल्या दिवशी या जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांचे मुख्यमंत्र्यांकडून स्वागत

जून 17, 2025
Gtj2vdeWgAA7QAN 1920x1440 1 e1750112697963

मुंबईत वॉटर मेट्रो…तीन महिन्याच्या आत आराखडा सादर करण्याच्या सूचना

जून 17, 2025
Untitled 45

पॉलिटेक्निक अभ्यासक्रमासाठी अर्ज सादर करण्यासाठी या तारखेपर्यंत अंतिम मुदतवाढ…

जून 17, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011