इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – क्रूझ ड्रग्ज प्रकरणी निर्दोष सुटका झाल्यानंतर आता आर्यन खान बऱ्यापैकी सोशल होताना दिसतो आहे. अनन्या पांडे आणि आर्यन खान चांगले मित्र आहेत. इतकेच नव्हे तर आर्यन आणि अनन्या पांडे अनेकदा स्पाॅट होतात. आर्यन खान काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहे. या दोघांचे अनेक फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होतात. नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये अनन्या पांडे आणि आर्यन खान दिसतायत. मात्र, हा व्हिडीओ व्हायरल होण्याचं हे कारण नाहीच. त्यामागे एक वेगळेच कारण आहे.
अनन्या पांडे आणि आर्यन खानचा हा व्हायरल व्हिडीओ एका पार्टीतील आहे. अनन्या पांडे आर्यन खानशी बोलण्यासाठी थांबली होती, परंतु, आर्यन अनन्याकडे दुर्लक्ष करून पुढे जातो. आर्यनचे वागणे पाहून अनन्याला देखील नेमके काय घडले हे कळत नाही आणि ती त्याचठिकाणी काही वेळ उभी राहते. हा सगळा प्रसंग या व्हिडिओत चित्रित झाला आहे.
अनन्या आणि आर्यनमध्ये असे नेमके काय घडले की, आर्यन खानने तिला इग्नोर करण्याइतपत वेळ आली, असा प्रश्न समोर येत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. काही दिवसांपूर्वी आर्यन खान अनन्या पांडेचे वडील अर्थात चंकी पांडेच्या बर्थडे पार्टीला गेला होता. त्याचेही फोटो व्हायरल झाले होते.
Aaryan Khan Ignore Ananya Pande Video Viral
Bollywood Entertainment