कोरोनाच्या वाढत्या संसर्गाला प्रतिबंध घालण्यासाठी देशभरात लसीकरण सुरू झाले आहे. परंतु काही ठिकाणी लसींची टंचाई जाणवत असल्याने अनेक नागरिकांना लसीचा केवळ पहिला डोस मिळाला असून त्यांना अद्याप दुसऱ्या डोसची प्रतीक्षा आहे. तर काही नागरिकांना अजून पहिला डोस देखील उपलब्ध झालेला नसल्याने सर्व वयोगटातील नागरिकांमध्ये या संबंधित सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी आरोग्य सेतू ॲप वर माहिती उपलब्ध आहे.
देशातील लोकांच्या सोयीकरिता आयटी आणि इलेक्ट्रॉनिक्स मंत्रालय कोरोना संबंधी सरकारी अॅप अद्ययावत करत राहते. आरोग्य सेतु अॅपवरून आता कोरोना लसीकरणाची स्थिती देखील मिळू शकते. मंत्रालयाने या ट्विटमध्ये म्हटले आहे की, आता तुमची लसीकरण स्थिती आरोग्य सेतूवर अद्ययावत केली जाऊ शकते.
यात म्हटले की, आपली स्वतःची लस मिळवा व दुहेरी निळा शिल्ड मिळवा. कारण ज्यांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत, त्यांना अॅपच्या मेन फोल्डरवर (मुख्य पृष्ठावर) निळ्या रंगाचे शिल्ड मिळेल. संबंधी लोक लसच्या दुसर्या डोसच्या १४ दिवसानंतरच आपल्या मोबाईल अॅपवर ही सुविधा पाहू शकतात. तसेच कोणताही मोबाईल वापरकर्ता त्याच्या मोबाइलवर लसीकरण स्थितीची माहिती करण्यास सक्षम असेल.
केंद्र सरकारच्या म्हणण्यानुसार, या अॅप सुविधेमुळे कुठेतरी प्रवास करताना लसीची स्थिती जाणुन घेणे आणि तपासणे सोपे होईल. कोविन नोंदणीसाठी वापरल्या जाणार्या मोबाईल क्रमांकाद्वारे लसीकरण स्थिती अद्यावत केली जाऊ शकते. आरोग्य सेतु अॅपवरील आकलनानुसार, ज्या लोकांनी कोरोना लस कमीतकमी एक डोस घेतला असेल त्यांना आरोग्य सेतुच्या होम स्क्रीनवर लसीकरणाची माहिती मिळेल.