सुयश सोनवणे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
शेतकरी संघटनेचे नेते. स्वर्गीय शरद जोशी यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी नाशिकच्या सटाणा येथील शेतकरी व व्यंगचित्रकार किरण मोरे यांनी कांद्यावर त्यांचे चित्र रेखाटले. १९८०च्या दशकात नाशिक जिल्हयाच्या कांदा प्रश्नावर शेतकरी संघटनेच्या माध्यमातून शरद जोशी यांनी मोठा लढा दिला होता. या आंदोलनातून शेतक-यांना न्याय मिळवून दिला होता. पण, आता कांद्याला भाव नाही, अनेक शेतकरी संघटना आंदोलन करुन मात्र सरकार त्याची दखल घेत नाही. त्यामुळे या चित्राबरोबरच कांद्याला तीस रुपये दर मिळावा असे ही मोरे यांनी कांद्यावर रेखाटले आहे.