चांदवड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – चांदवड तालुक्यातील कातरवाडी येथील शेतकरी कुटूंबातील शेतकरी सोपान बाबुराव झाल्टे हे त्यांच्या राहत्या घराच्या पत्र्याच्या शेड मध्ये झोपलेले असतांना त्यांच्यावर अज्ञात मारेक-यांनी प्राणघातक हल्ला केल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या हल्यावेळी झाल्टे यांचे वडिल बाबुराव झाल्टे हे हल्लेखोरांना रोखण्यासाठी गेले असता त्यात ते ही यात गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर चांदवड येथे शासकीय रुग्णालयात उपचार करुन त्यांना पुढील उपचारासाठी नाशिक येथे पाठविण्यात आले आहे. झाल्टे यांच्या पत्नीच्या तक्रारी वरुन चांदवड पोलिस स्थानकात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास मनमाड उपविभागीय पोलिस अधिकारी समिरसिंह साळवे करीत आहे.