इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – भारतात सर्वाधिक विकल्या जाणारा स्मार्टफोन सॅमसंगने Galaxy Z Fold 3 5G आणि Galaxy Z Flip 3 5G या दोन स्मार्टफोनवर बंपर ऑफर दिली आहे. ग्राहकांना सॅमसंग फायनान्स+ वर Galaxy Z Fold3 5G किंवा Galaxy Z Flip3 5G च्या खरेदीवर ५ हजार रुपयांचा कॅशबॅक मिळू शकतो. हे बजेट सर्वसामान्यांना भारी पडेल, पण या दोन्हीवर तुमची ५ हजार रुपयांपर्यंत बचत होत आहे.
Galaxy Z Fold-3 5G हे एक वास्तविक मल्टीटास्किंग डिव्हाइस आहे. ज्यामध्ये नेक्स्ट लेवल पर्फोर्मंस, 7.6-इंचाचा इन्फिनिटी फ्लेक्स डिस्प्ले आणि फोल्ड करण्यायोग्य डिव्हाइसवर प्रथमच एस पेन सपोर्ट आहे. ज्यांना स्टाईलची आवड आहे त्यांच्यासाठी, Galaxy Z Flip3 5G हा स्लीक, कॉम्पॅक्ट आणि खिशात ठेवता येण्याजोगा आहे. आकर्षक डिझाइन, लेटेस्ट कॅमेरा ही त्याची वैशिष्ट्ये आहेत. तसेच, दैनंदिन वापरासाठी मोठ्या कव्हर स्क्रीनसाठी एक उत्तम फोन आहे.
Galaxy Z Fold 3 5G च्या खरेदीवर, ग्राहकांना सर्व बँक डेबिट किंवा क्रेडिट कार्डांवर ७ हजार रुपयांचा अपग्रेड बोनस किंवा ७ हजार रुपयंचा चा झटपट कॅशबॅक मिळू शकतो. Galaxy Z Flip3 5G च्या खरेदीवर ७ हजाराचा बँक कॅशबॅक किंवा १० हजार रुपयांचा अपग्रेड बोनस मिळवू शकतात. याशिवाय Galaxy Z मालिकेत ग्राहक ११ हजार ९९९ रुपयांवर Galaxy Buds 2 मोफत मिळू शकतो. सर्व ऑफर 31 जानेवारी 2022 पर्यंत वैध आहेत.