नाशिक – विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी पतीसह सासरच्या चार जणांविरुद्ध म्हसरूळ पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. विवाहितेच्या वडिलांना तुमची मुलगी व्यवस्थित राहत नाही, असे म्हणून ती व्यवस्थित नांदेल, आत्महत्या करणार नाही, असे लिहून द्या, असे म्हणून विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केला. या त्रासाला कंटाळून विवाहितेने म्हसरूळ पोलीस ठाण्यात पतीसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पीडित विवाहिता २५ जून २०२० ते १२ मे २०२१ या कालावधीत सासरी नांदत असताना पतीसह सासरच्या चार नातेवाईकांनी छोट्या-छोट्या गोष्टींवरून विवाहितेला हॉटेलमध्ये लग्न लावून दिले नाही या कारणावरून विवाहितेस माहेरी जायचे नाही, तुझ्या घरच्यांशी नाते तोडून टाक, तू फारकत दे, आमच्या मुलाला दुसरी बायको करून देऊ, असा मानसिक त्रास देऊन मारहाण केल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अहिरे करीत आहेत.