इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – जगात सर्वात आधी कोंबडी आली की अंडे? हा प्रश्न संपूर्ण जगाला सतावत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या प्रश्नाचे उत्तर वैज्ञानिक शोधत आहेत. हेच काय, हा प्रश्न अनेक स्पर्धात्मक परीक्षांमध्येही विचारला गेला असेल. पण त्याचे उत्तर कोणालाही ठाऊक नव्हते. मात्र ब्रिटनच्या वैज्ञानिकांनी याचे उत्तर शोधून काढले आहे.
ब्रिटेनच्या शेफिल्ड आणि वार्विक विद्यापीठाच्या संशोधकांनी या विषयावर संशोधन केले आहे. अभ्यासाचे लेखक डॉ. कोलिन फ्रिमॅन सांगतात, जगात सर्वात आधी कोंबडी आली की अंडे या प्रश्नाचे उत्तर जगभरातील संशोधक शोधत आहेत. फ्रिमॅन सांगतात, अभ्यासादरम्यान अनेक वर्षांपर्यंत या प्रश्नाचे उत्तर मिळू शकले नाही. परंतु आता हे सिद्ध झाले आहे की सर्वात आधी कोंबडी आली होती. अंडे तयार होण्यासाठी ओवोक्लाइडिन नावाचे प्रथिने आवश्यक असते. अंड्याच्या निर्मितीसाठी हेच प्रथिने आवश्यक असते. कोंबडी गर्भवती होण्यादरम्यान हे विशेष प्रकारचे प्रथिने कोंबडीच्या गर्भाशयात तयार होते. त्यावरून आधी कोंबडी आली होती, हे स्पष्ट होते, असे संशोकांचे म्हणणे आहे.
हायटेक कॉम्प्युटर
या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी संशोधकांनी हायटेक कॉम्प्युटर (एचईसीटीओआर) चा वापर केला आहे. यादरम्यान वैज्ञानिकांनी अंड्यावरील आवरणाचे मॉलिक्युलर स्ट्रक्चर समजून घेतले. संशोधनादरम्यान असे आढळले की, ओवोक्लाइडिन प्रथिनाच्या मदतीने कॅल्शिअम कार्बोनेटद्वारे अंड्याचे बाह्य आवरण बदलते. हळूहळू ते कवच टणक होते.
२४ ते ३६ तासात अंडे
संशोधक डॉ. कोलिन सांगतात, कोंबड्यांची हाडे आणि अंड्यांच्या बाह्य आवरणात कॅल्सिट क्रिस्टल आढळते. अंडे पूर्णपणे तयार झाल्यानंतर ते बाहेर येते. बहुतांश कोंबड्या २४ ते ३६ तासांत अंडी देतात. दुसरे अंडे देईपर्यंत कोंबडी आधीच्या अंड्यावर बसून राहाते. त्यामुळे ताजे अंडे दररोज हटविले पाहिजे.
कोंबडी कशी आली?
डॉ. कोलिन सांगतात, जगात आधी कोंबडी आली की अंडे याचे उत्तर मिळाले आहे. परंतु जगात कोंबडी कशी विकसित झाली, याचे उत्तर अद्याप मिळायचे आहे. जगातील अनेक संशोधक या प्रश्नाचे उत्तर शोधत आहेत.