India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

आता बिनधास्त प्रवास करा! रेल्वेत तुमचे सामान हरवले तरी घाबरण्याची गरज नाही

India Darpan by India Darpan
January 14, 2022
in महत्त्वाच्या बातम्या
0
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

प्रातिनिधीक संग्रहित फोटो


 

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भारतीय रेल्वे देशाची जीवनवाहिनी मानली जाते. काश्मीरपासून ते कन्याकुमारीपर्यंत आणि सोरटी सोमनाथ पासून ते कोलकाता पर्यंत देशाच्या कोणत्याही भागात आपल्याला रेल्वेने प्रवास करता येतो. रेल्वेचा प्रवास हा सुलभ आणि सुखकर मानला जातो. परंतु त्याचबरोबर या प्रवासात जे सामान सोबत न्यावे लागते, या सामानाची आपल्यालाच काळजी घ्यावी लागते. अन्यथा ते चोरीला जाऊ शकते. चोरीच्या भीतीने अनेकजण रेल्वे प्रवासात रात्रंदिवस सामानाची काळजी करतात.

आता यापुढे अशी काळजी करण्याची गरज राहणार नाही. कारण रेल्वे प्रवाशांना प्रवासादरम्यान सामान हरवण्याची भीती राहणार नाही. हरवलेल्या सामानाचा शोध घेण्यासाठी भारतीय रेल्वेने एक नवीन उपक्रम सुरू केला आहे. या अंतर्गत प्रवाशी त्याच्या हरवलेल्या सामानाचा माग काढू शकतो. तो त्यांना सहज परत मिळवू शकतो. प्रवाशांची तसेच त्यांच्या सामानाची सुरक्षा सुनिश्चित करण्यात रेल्वे संरक्षण दल महत्त्वाची भूमिका बजावते. आरपीएफने या दिशेने मिशन अमानत सुरू केले आहे. त्यामुळे प्रवाशांना हरवलेले सामान सहज मिळेल.

पश्चिम रेल्वेने एका ट्विटमध्ये म्हटले आहे की, प्रवाशांना हरवलेले सामान परत मिळणे सोपे व्हावे यासाठी आरपीएफने एक नवीन पुढाकार घेतला आहे. मिशन अमानत अंतर्गत, हरवलेल्या वस्तूंची माहिती छायाचित्रांसह रेल्वेच्या अधिकृत वेबसाइटवर अपलोड केली जाईल. मिशन अमानत आरपीएफ वेबसाइट http://wr.indianrailways.gov.in वर पोस्ट केलेल्या छायाचित्रांसह प्रवासी सामानाचा तपशील तपासू शकतात.

पश्चिम रेल्वेच्या मुख्य जनसंपर्क अधिकार्‍यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, गेल्या वर्षी रेल्वे संरक्षण दलाने एकूण १३१७ चोरट्यांकडून सुमारे २.५८ कोटी रुपयांचा माल जप्त केला होता. पडताळणीनंतर त्यांनी ते मूळ मालकांना दिले आहेत. ऑपरेशन मिशन अमानत अंतर्गत रेल्वे संरक्षण दल चांगल्या प्रवाशांना ही सेवा पुरवते. प्रवाशांच्या सुरक्षित आणि आरामदायी प्रवासासाठी आरपीएफ चोवीस तास काम करत असते. रेल्वे संरक्षण दलाने प्रतिबंधात्मक उपाययोजना करून आणि रेल्वे परिसरात गुन्हेगारी शोधून देशभरातील राष्ट्रीय वाहतूकदाराच्या मोठ्या मालमत्तेचे रक्षण करण्याची जबाबदारी पार पाडली आहे.


Previous Post

तब्बल २ कोटी ३१ लाख किंमत असलेली आलिशान कार लॉन्च; बघा तिचे फिचर्स

Next Post

जगात आधी काय आले? कोंबडी की अंडे? वैज्ञानिकांना मिळाले हे उत्तर

Next Post

जगात आधी काय आले? कोंबडी की अंडे? वैज्ञानिकांना मिळाले हे उत्तर

ताज्या बातम्या

महाराष्ट्र राज्यगीत गायनाची नियमावली जाहीर; असे आहेत सरकारचे आदेश

February 2, 2023

FPO का मागे घेतला? गुंतवणूकदारांच्या पैशांचे काय? गौतम अदानी म्हणाले…. (व्हिडिओ)

February 2, 2023

महिलेच्या घरावर दगडफेक करुन वाहनाची तोडफोड करणा-या तीन जणांना पोलिसांनी केले गजाआड

February 2, 2023

बंदी घालण्यात आलेल्या विदेशी मांगूर माश्याचे घरातील हौदात उत्पादन; ३०० किलो मासे जप्त

February 2, 2023

पेट्रोल पंपावरील कामगाराने रोकड घेवून केला पोबारा; गुन्हा दाखल

February 2, 2023
प्रातिनिधिक फोटो

नाशकात गोल्फ क्लब मैदानावर मॉर्निंग वॉक करणाऱ्या महिलेचा विनयभंग

February 2, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group