इंडिया दर्पण – हास्य षटकार – चिट्यांचे रिपोर्ट कार्ड
(चिंट्या त्याचे रिपोर्ट कार्ड घेऊन शाळेत जातो तेव्हा)
चिंधडे गुरुजी – चिंट्या, तुझ्या रिपोर्ट कार्डवर
पालकांची सही का नाहीय
आणि
हे सहीच्या जागी
गोलगोल वेटोळे
का काढून ठेवले आहेस
चिंट्या – मास्तर, ती माझ्या
आजीची सही आहे
चिंधडे मास्तर – अच्छा हो का.
अरे तुझ्या
आजीचं नाव
काय आहे
चिंट्या – मास्तर,
जिलेबी बाई
– हसमुख