साप्ताहिक राशिभविष्य – 9 ते 16 जानेवारी
मेष – सामाजिक कामात व्यक्तिगत खर्चावर नियंत्रण ठेवा. बुद्धी व भावना यातील समतोल असू द्या. फायद्यासाठी तत्वांशी तडजोड नको. व्यापारवृद्धी आर्थिक उलाढाल वाढेल. जोडीदाराच्या भावना जपा म्हणजे तोही आपल्या जपेल. काल्पनिक समस्या तयार करू नये…
वृषभ – संमिश्र अनुभवांचा सप्ताह. अनपेक्षित सुखद वार्ता. शब्द व क्रोधावर संयम हवा. विचारपूर्वक आश्वासन द्या. आर्थिकदृष्ट्या संमिश्र अनुभव. तब्येतीकडे दुर्लक्ष करू नये. ज्येष्ठांचे मार्गदर्शन गरजेचे…
मिथुन – कौटुंबिक कुरबुरी वाढवू नये .प्रत्येकाला स्पेस द्यावी. प्लॅनिंगचा अतिरेक नको. प्रत्यक्ष कृतीवर भर द्यावा. मोठ्या खरेदीची शक्यता. उत्पादन वाढीसाठी प्रयत्नपूर्वक आखणी हवी. खर्च व उत्पन्नाच वेळापत्रक मेंटेन करा…
कर्क – छोट्या छोट्या वादाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करा. व्यापक नवे करार मदार होतील. अतिउत्साह त्रासदायक ठरेल. परिश्रमाचे चीज होईल. सुखद वार्ता मिळेल. कौटुंबिक ताळमेळ जमेल…
सिंह – घाईगडबडीत मोठा निर्णय नको. कुटुंबातील सदस्यांचे उत्तम सहकार्य मिळेल. आरोग्यविषयक तक्रारीकडे दुर्लक्ष नको. वरिष्ठांची मर्जी सांभाळा. नवे व्यवसाय धोके संभाळून व्यवसाय करा. अनावश्यक शब्द देऊ नये…
कन्या – यशप्राप्तीसाठी नेहमीपेक्षा अधिक प्रयत्न गरजेचे. शॉर्ट टर्म इन्वेस्टमेंट करू नये. जेष्ठ तसेच वरिष्ठांचे आशीर्वाद मिळतील. टिमवर्क वर भर द्या. जुने सहकारी साथ देतील. प्रतिक्रियांसाठी सौम्य शब्द वापरा…
तूळ – रचनात्मक विचार वाढवा. भावनात्मक संयम दीर्घकालीन फायदा देईल. सकारात्मक परिचितांशी संबंध ठेवा. आर्थिक प्लॅनिंग आवश्यक. शॉर्टकट उत्पन्नाचा विचार करू नये…
वृश्चिक – नवा व्यवसायिक विचार सुचेल. कठीण प्रसंगी भाग्याची साथ मिळेल. कौटुंबिक स्पेस, बुद्धी चातुर्याने टिकवा. परिचितांशी भावनिक आघाडी सांभाळा. चिंता करण्यापेक्षा योग्य प्लॅनिंग करा. नातेसंबंध सांभाळा…
धनु – आर्थिक व्यवहार अधिक काळजीपूर्वक करा. उधार उसनवार देणे-घेणे टाळा. वैचारिक मतभेद प्रयत्नपूर्वक टाळा. वरिष्ठांकडून प्रशंसा तर परिचितांकडून अपेक्षित सहकार्य मिळेल. कफाचा त्रास संभवतो. तब्येतीकडे दुर्लक्ष नको….
मकर – जुने वाद, गैरसमज सोडून नव्याने रिलेशन मेंटेन करा. अधिक व्यापक पद्धतीचे प्लॅनिंग करून प्रगतीचे जाळे वाढवा. किरकोळ घटनांमुळे महत्त्वाच्या व्यक्तींची कटुता टाळा. नकारात्मक विचार नको. सर्वांना बोलण्यास संधी द्या….
कुंभ – अतिरिक्त खर्च व खरेदी टाळा. प्रयत्नपूर्वक कार्यास चौफेर यश मिळेल. कोणत्याही वादात आपण कारणीभूत होऊ नका. अडकलेली कामे बुद्धीचातुर्याने मार्गी लावा. खर्च व उत्पन्न यावर लक्ष ठेवा….
मीन – कॅलक्युलेटेड रिस्क घ्या. अति मेहनतीने तब्येतीवर परिणाम होईल. खानपान सांभाळा. अनिद्रा टाळा. वेळेचे योग्य नियोजन करा. मल्टिटास्किंग प्लॅनिंग करावे…..
आजचा राहू काळ
संध्याकाळी साडे चार ते सहा आहे