नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – रेडक्रॉस भागात सिटी लिंक बस अडवून दुचाकीस्वारांनी चालकास बेदम मारहाण करुन बसचेही नुकसान केले आहे. या मारहाणीप्रकरणी रामभाऊ अर्जुन शिंदे (रा.जनार्दननगर,नांदूरनाका) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल असून सरकारवाडा पोलिस ठाण्यात अज्ञात दुचाकीवरील दोघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिंदे महापालिकेच्या सिटीलिंक बसवर चालक या पदावर कार्यरत आहेत. सोमवारी (दि.१६) सायंकाळ्च्या सुमारास ते एमएच १५ जीव्ही ७९८५ या बसवर सेवा बजावत असतांना ही घटना घडली. शिंदे यांनी आपल्या ताब्यातील बस रेडक्रॉस येथील थांब्यावर थांबविली असता पाठीमागून अॅक्टीव्हावर आलेल्या अज्ञात दोघांनी बसला आपले वाहन आडवे लावत शिंदे यांना कुठलेही कारण नसतांना शिवीगाळ केली. यावेळी संतप्त दोघांनी बसला लाथा मारून दारे उघडण्यास भाग पाडले. यानंतर शिंदे यांना बसखाली खेतच दोघांनी लाथाबुक्यांनी बेदम मारहाण केली. या घटनेत बसच्या चढण्याच्या आणि उतरण्याच्या दरवाजासह चालकाच्या दरवाजाचेही मोठे नुकसान झाले असून अधिक तपास उपनिरीक्षक नेमाणे करीत आहेत.