नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जुईनगर भागात भाजीपाला खरेदी करण्यासाठी घराबाहेर पडलेल्या महिलेच्या गळयातील तीन तोळे वजनाची सोनसाखळी दुचाकीस्वाराने लंपास केली. या चोरीप्रकरणी सुमन प्रकाश पगारे (५५ रा. जुईनगर किशोर सुर्यवंशी मार्ग) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली असून म्हसरूळ पोलिस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पगारे या सोमवारी (दि.१६) सायंकाळच्या सुमारात परिसरातील गुजरीत भाजीपाला खरेदी करण्यासाठी जात असतांना ही घटना घडली. पांजरा पोळच्या भिंतीजवळून त्या पिठ गिरणीच्या दिशेने रस्त्याने पायी जात असतांना रॉंगसाईडने काळया दुचाकीवर आलेल्या भामट्याने त्यांच्या गळयातील सुमारे १ लाख २० हजार रूपये किमतीची सोनसाखळी खेचून पोबारा केला. अधिक तपास उपनिरीक्षक घडवजे करीत आहेत.