नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – औद्योगीक वसाहतीतील कार्बननाका भागात भरधाव अज्ञात वाहनाने कट मारल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. नामदेव रामदास चौधरी (३९ रा.चाणक्यपूरी सोसा.म्हसरूळ म.बाद लिंकरोड) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे. चौधरी दुचाकीवरून पडल्याने त्यांच्या छातीस आणि डोक्यास गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. चौधरी गेल्या रविवारी (दि.८) श्रमिकनगर भागात गेले होते. कडे पठार चौकाकडून ते आपल्या पॅशन प्रो एमएच १५ बीएस ७९४१ दुचाकीने कार्बन नाक्याच्या दिशेने प्रवास करीत असतांना हा अपघात झाला. पाठीमागून भरधाव आलेल्या अज्ञात वाहनाने चौधरी यांच्या दुचाकीस कट मारला. या घटनेत ते रस्त्यावर पडल्याने त्याच्या छातीस आणि डोक्यास गंभीर दुखापत झाली होती. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक पठाण करीत आहेत.