नवी दिल्ली – देशव्यापी लसीकरण मोहीमेंतर्गत आत्तापर्यंत एकूण 220.17 कोटी लसमात्रा दिल्या गेल्या आहेत. (त्यापैकी 95.14 कोटी लसमात्रा, या लसीकरणाचा दुसरा डोस म्हणून तर 22.45 कोटी खबरदारीची लसमात्रा म्हणून दिल्या गेल्या आहेत.)
– गेल्या 24 तासात 23,490 लसमात्रा दिल्या गेल्या.
– भारतातील सक्रिय रुग्णसंख्या 2,149 आहे.
– सक्रिय रुग्णसंख्या 0.01% आहे.
– रुग्ण बरे होण्याचा दर 98.8% आहे.
– गेल्या 24 तासात 182 रुग्ण बरे झाले त्यामुळे रुग्ण बरे होणाऱ्यांची एकूण संख्या 4,41,48,165 वर पोहोचली आहे.
– गेल्या 24 तासात 104 नवे रुग्ण नोंदवले गेले.
– दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 0.07%।आहे.
– साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर 0.10% आहे.
– आतापर्यंत एकूण 91.32 कोटी चाचण्या केल्या आहेत. मागील 24 तासात 1,52,825 चाचण्या करण्यात आल्या.