मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत असलेले मुकेश अंबानी आणि निता अंबानी यांनी थोडेथोडके नव्हे तर तब्बल ३०० किलो सोने दान केले आहे. निमित्त नाताळाचे नाही तर ते होते आपल्या जुळ्या नातवंडांच्या आगमनाचे. अंबानी कुटुंबातील नव्या पिढीच्या आगमनाचा मोठा उत्साह असल्यानेच त्याचा एक भाग म्हणून सुवर्णदान करण्यात आले.
मुलगी इशा अंबानी आणि जावई आनंद पिरामल यांनी दि. १९ नोव्हेंबर रोजी जुळ्या मुलांना जन्म दिल्याने मुकेश अंबानी आणि निता अंबानी हे आजी-आजोबा बनले. इशा यांच्या मुलाचे नाव कृष्णा आणि मुलीचे नाव आदिया असे आहे. जुळ्या मुलांना जन्म दिल्यानंतर पती आनंद परिमल हे त्यांच्या जुळ्या बाळांसोबत पहिल्यांदाच अमेरिकेतून भारतात आले. त्यांच्या आगमनासाठी जय्यत तयारी करण्यात आली होती. इतकेच नव्हे तर बाळांची काळजी घेण्यासाठी त्या विमानामध्ये अमेरिका आणि भारतातील स्पेशालिस्ट डॉक्टरांची टीमही त्यांच्यासोबत होती.
नातवंडे पहिल्यांदा भारतात येत असल्याने अंबानी कुटूंबियांनी आपला आनंद व्यक्त करण्यासाठी तब्बल ३०० किलो सोने दान केले. त्याची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे. बाळाच्या आगमनासाठी अंबानी कुटूंब काय करणार, याची मोठी उत्सुकता सर्वांनाच होती. बाळांच्या स्वागतासाठी अंबानी कुटूंबाने जय्यत तयारी केली होती. ईशा अंबानीच्या ‘करुणा सिंधू’ नावाच्या घरी तब्बल एक हजार साधूसंतांचे आगमन झाले. अंबानी आणि पिरामल कुटुंबाने यावेळी घोषणा केली की हे दोन्ही कुटुंब एकत्रितरित्या पाच अनाथाश्रम सुरु करणार आहेत. बाळाच्या स्वागतासाठी ग्रँड सेरेमनी आणि जगभरातील फेमस शेफच्या हातून पंचपक्वान्न बनविण्यात आले.
आणखी खास गोष्ट म्हणजे अंबानी कुटूंबाने बाळांसाठी इंटरनॅशनल ब्रँड्सचे फर्निचर आणि नर्सरी तयार करण्यात आली आहे. बाळांसाठी महागड्या ब्रँडचे खास कपडे बनवून घेण्यात आले. बाळांसाठी चक्क बीएमडब्ल्यू कंपनीकडून कार सीट डिझाईन करुन घेण्यात आली. बाळांच्या काळजीसाठी स्पेशिअल डॉक्टरची टीम सज्ज होती. अंबानी आणि परिमल यांच्या बंगल्यावर आकर्षक रोषणाई करण्यात आली. ‘करुणा सिंधू’ आणि ‘अँटेलिया’ची फुलांनी आणि बहुरंगी सजावट करण्यात आली. या स्वागताची गेल्या काही दिवसांपासून दोन्ही घरांमध्ये लगबग सुरु होती. मुकेश अंबानी आणि निता अंबानींनी या तयारीवर जातीने लक्ष घातले.
इशा आणि त्यांच्या जुळ्या मुलांना भारतात परतण्यासाठी कतारमधून विशेष विमानाची सोय करण्यात आली होती. हे विमान स्वत: कतारच्या राजाने पाठवले होते. कतारचा राजा आणि अंबानी यांचे घरोब्याचे संबंध आहेत. लहान मुलांच्या आरोग्यासंदर्भातील तज्ज्ञ असलेल्या अमेरिकेतील सर्वोत्तम डॉक्टर्सपैकी एक असलेले डॉक्टर गिबसनही या विमानामध्ये होते. अंबानींच्या या जुळ्या नातवंडांना अमेरिकेमधून विशेष प्रशिक्षण घेऊन आलेल्या नर्सेस संभाळत होत्या. खास भोजन व प्रसाद मेन्यू साठी जगभरातील वेगवेगळ्या देशांमधून विशेष स्वयंपाक्यांना बोलवण्यात आले होते. त्यांच्याद्वारे विशेष प्रसाद तयार करण्यात आला. तिरुपती बालाजी मंदिर, नथद्वारामधील श्रीनाथजी, द्वारकाधीश मंदिरातील प्रसादाप्रमाणे प्रसाद बनविण्यात आला.
Ambani Family Donate 300 KG Gold for this Reason
Grand Welcome Twins Baby Nita Ambani Mukesh Ambani Isha Ambani