India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

अंबानींनी दान केले तब्बल ३०० किलो सोने; नाताळ नाही तर हे आहे कारण

India Darpan by India Darpan
December 25, 2022
in संमिश्र वार्ता
0

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत असलेले मुकेश अंबानी आणि निता अंबानी यांनी थोडेथोडके नव्हे तर तब्बल ३०० किलो सोने दान केले आहे. निमित्त नाताळाचे नाही तर ते होते आपल्या जुळ्या नातवंडांच्या आगमनाचे. अंबानी कुटुंबातील नव्या पिढीच्या आगमनाचा मोठा उत्साह असल्यानेच त्याचा एक भाग म्हणून सुवर्णदान करण्यात आले.

मुलगी इशा अंबानी आणि जावई आनंद पिरामल यांनी दि. १९ नोव्हेंबर रोजी जुळ्या मुलांना जन्म दिल्याने मुकेश अंबानी आणि निता अंबानी हे आजी-आजोबा बनले. इशा यांच्या मुलाचे नाव कृष्णा आणि मुलीचे नाव आदिया असे आहे. जुळ्या मुलांना जन्म दिल्यानंतर पती आनंद परिमल हे त्यांच्या जुळ्या बाळांसोबत पहिल्यांदाच अमेरिकेतून भारतात आले. त्यांच्या आगमनासाठी जय्यत तयारी करण्यात आली होती. इतकेच नव्हे तर बाळांची काळजी घेण्यासाठी त्या विमानामध्ये अमेरिका आणि भारतातील स्पेशालिस्ट डॉक्टरांची टीमही त्यांच्यासोबत होती.

नातवंडे पहिल्यांदा भारतात येत असल्याने अंबानी कुटूंबियांनी आपला आनंद व्यक्त करण्यासाठी तब्बल ३०० किलो सोने दान केले. त्याची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे. बाळाच्या आगमनासाठी अंबानी कुटूंब काय करणार, याची मोठी उत्सुकता सर्वांनाच होती. बाळांच्या स्वागतासाठी अंबानी कुटूंबाने जय्यत तयारी केली होती. ईशा अंबानीच्या ‘करुणा सिंधू’ नावाच्या घरी तब्बल एक हजार साधूसंतांचे आगमन झाले. अंबानी आणि पिरामल कुटुंबाने यावेळी घोषणा केली की हे दोन्ही कुटुंब एकत्रितरित्या पाच अनाथाश्रम सुरु करणार आहेत. बाळाच्या स्वागतासाठी ग्रँड सेरेमनी आणि जगभरातील फेमस शेफच्या हातून पंचपक्वान्न बनविण्यात आले.

View this post on Instagram

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

आणखी खास गोष्ट म्हणजे अंबानी कुटूंबाने बाळांसाठी इंटरनॅशनल ब्रँड्सचे फर्निचर आणि नर्सरी तयार करण्यात आली आहे. बाळांसाठी महागड्या ब्रँडचे खास कपडे बनवून घेण्यात आले. बाळांसाठी चक्क बीएमडब्ल्यू कंपनीकडून कार सीट डिझाईन करुन घेण्यात आली. बाळांच्या काळजीसाठी स्पेशिअल डॉक्टरची टीम सज्ज होती. अंबानी आणि परिमल यांच्या बंगल्यावर आकर्षक रोषणाई करण्यात आली.  ‘करुणा सिंधू’ आणि ‘अँटेलिया’ची फुलांनी आणि बहुरंगी सजावट करण्यात आली. या स्वागताची गेल्या काही दिवसांपासून दोन्ही घरांमध्ये लगबग सुरु होती. मुकेश अंबानी आणि निता अंबानींनी या तयारीवर जातीने लक्ष घातले.

View this post on Instagram

A post shared by Manav Manglani (@manav.manglani)

इशा आणि त्यांच्या जुळ्या मुलांना भारतात परतण्यासाठी कतारमधून विशेष विमानाची सोय करण्यात आली होती. हे विमान स्वत: कतारच्या राजाने पाठवले होते. कतारचा राजा आणि अंबानी यांचे घरोब्याचे संबंध आहेत. लहान मुलांच्या आरोग्यासंदर्भातील तज्ज्ञ असलेल्या अमेरिकेतील सर्वोत्तम डॉक्टर्सपैकी एक असलेले डॉक्टर गिबसनही या विमानामध्ये होते. अंबानींच्या या जुळ्या नातवंडांना अमेरिकेमधून विशेष प्रशिक्षण घेऊन आलेल्या नर्सेस संभाळत होत्या. खास भोजन व प्रसाद मेन्यू साठी जगभरातील वेगवेगळ्या देशांमधून विशेष स्वयंपाक्यांना बोलवण्यात आले होते. त्यांच्याद्वारे विशेष प्रसाद तयार करण्यात आला. तिरुपती बालाजी मंदिर, नथद्वारामधील श्रीनाथजी, द्वारकाधीश मंदिरातील प्रसादाप्रमाणे प्रसाद बनविण्यात आला.

Ambani Family Donate 300 KG Gold for this Reason
Grand Welcome Twins Baby Nita Ambani Mukesh Ambani Isha Ambani


Previous Post

संतापजनक! १५ वर्षीय मुलीवर ६ जणांचा सामूहिक बलात्कार; परळ येथील घटना

Next Post

राजकारण! भाऊ चौधरींना ही मोठी जबाबदारी देऊन शिंदेंनी खेळली ही खेळी

Next Post

राजकारण! भाऊ चौधरींना ही मोठी जबाबदारी देऊन शिंदेंनी खेळली ही खेळी

ताज्या बातम्या

या व्यक्तींना आजचा दिवस आहे सुखप्राप्तीचा; जाणून घ्या, बुधवार, २९ मार्च २०२३चे राशिभविष्य

March 28, 2023

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – बुधवार – २९ मार्च २०२३

March 28, 2023

इंडिया दर्पण – हास्य षटकार – जेव्हा पत्नीचा अपघात होतो

March 28, 2023

कार्बन फूटप्रिंट म्हणजे काय? ते कसे मोजतात? त्याचा आणि आपला काय संबंध? घ्या जाणून अतिशय सोप्या शब्दात…

March 28, 2023
सग्रहित फोटो

ठाकरे सरकार नेमके कसे कोसळले… कशी होती व्यूहरचना… तानाजी सावंतांनी अखेर सगळं स्पष्टच सांगितलं…

March 28, 2023

शिंदेंनी विचारले, ‘वाचू का?’ फडणवीस म्हणाले, ‘नाही, गरज नाही’; पत्रकार परिषदेचा व्हिडिओ व्हायरल

March 28, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group