इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – मराठी, हिंदी मनोरंजन सृष्टीत सध्या सेलिब्रेशनचे दिवस सुरू आहेत. कुठे लग्न तर कुठे साखरपुडा होतो आहे. त्यातच अभिनेत्री गौहर खानने गुड न्यूज दिली आहे. याबाबतचा एक व्हिडिओ तिने शेअर केला आहे. ‘बिग बॉस ७’ची विजेती गौहर खान आणि झैद दरबार २५ डिसेंबर २०२० रोजी विवाहबंधनात अडकले. खरं तर लग्नानंतर तीन महिन्यातच गौहर प्रेग्नंट असल्याच्या चर्चा होत्या. पण नंतर त्या अफवा असल्याचं समोर आलं होतं. त्यावर गौहर चांगलीच भडकली होती. त्यानंतर आता, वयाच्या ३९ व्या वर्षी गौहरने गुड न्यूज दिली आहे.
या ख्रिसमसला त्यांच्या लग्नाला दोन वर्षे पूर्ण होणार आहेत. त्यापूर्वीच गौहर खानने चाहत्यांसोबत ही खास बातमी शेअर केली आहे. अतिशय अनोख्या पद्धतीने तिने ही बातमी चाहत्यांना दिली आहे. एक कार्टूनचा व्हिडिओ शेअर करत ‘गौहर झैद आणि +१’ असं तिने तिच्या या पोस्टमध्ये म्हटलं आहे. या सुखद प्रवासात तुमच्या आशीर्वादाची गरज आहे, असंही तिने म्हटलं आहे. तिच्या या पोस्टवर चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
सोशल मीडियावर ती फारच सक्रिय असते. तिने आजवर त्यांच्या बऱ्याच आठवणी या माध्यमातून शेअर केल्या आहेत. त्यांच्या लग्नाचे फोटो चांगलेच व्हायरल झाले होते. बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींमध्ये गौहरचा समावेश होतो. नेटफ्लिक्सवरील ‘१४ फेरे की कहानी’ या चित्रपटात तिची महत्वाची भूमिका होती. आता गौहरच्या डोहाळे जेवणाचे फोटो पाहण्यास चाहते उत्सुक आहेत.
Actress Gauahar Khan Good News Share This Video