नाशिक – इंडिया दर्पण मीडिया हाऊस प्रकाशनातर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या ‘चुलीतले निखारे’ या जगदीश देवरे लिखित काव्यसंग्रहाचे प्रकाशन नाशिकमध्ये नुकतेच पार पडले असून या काव्यसंग्रहाला वाचकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. आमच्या या प्रकाशनातर्फे प्रकाशित करण्यात आलेले हे तिसरे पुस्तक आहे. संवेदनशील आणि चिंतनशील विषयांवरील कवितांखेरीच सामाजिक आशय जपणा-या अतिशय चांगल्या कवितांची मेजवानी असलेले हे पुस्तक असल्याची प्रतिक्रिया काही वाचकांकडून मिळत आहेत.
मुक्तछंदातल्या कविंताखेरीच ‘पाऊस’ ‘वारी’ ‘पावसाचे लग्न’ ‘दुष्काळ’ आणि इतर काही गेय कवितांचा या काव्यसंग्रहात समावेश आहे. या काव्यसंग्रहाच्या प्रकाशन समारंभात नाशिक येथील प्रथितयश संगीतकार श्री. संजय गीते यांनी त्यांच्या सोर्स म्युझिक स्टुडिओच्या माध्यमातून या पुस्तकातील काही कवितांच्या शब्दांना सुर देवून मंत्रमुग्ध करणारी गाणी सादर केली. व्यासपीठावरील मान्यवर पाहुणे आणि कै.मु.श.औरंगाबादकर सभागृहातील उपस्थितांनी या गाण्यांना भरभरुन दाद दिली.
या पुस्तकातल्या कविता आशयपुर्ण असल्याने त्यातली वाचनीयता अबाधित रहाते आणि वाचकाला त्यातून येणारा अनुभव हा जवळचा, त्याच्या आजूबाजूचा आणि आतमधला वाटतो अशा बोलक्या शब्दातल्या प्रतिक्रिया हा कवितासंग्रह आणखीनच वाचनीय बनवतात. या पुस्तकाची विक्री सध्या सवलतीच्या दरात (अवघ्या काही दिवसांसाठी) सुरू असून आता मोजक्या प्रती शिल्लक राहिलेल्या असल्यामुळे वाचकांनी या पुस्तकासाठी आपली मागणी त्वरीत नोंदवून आपली प्रत बुक करावी अशी विनंती करण्यात येत आहे.
अशी आहे सवलत
एकूण १०० पृष्ठसंख्या असलेल्या या पुस्तकाची मूळ किंमत रु.१४०/- इतकी आहे. परंतु, सध्या या पुस्तकाची विक्री रु.१२०/- इतक्या सवलतीच्या दरात सुरु आहे. पुस्तकाची सवलतीची किंमत रु.१२०/- + पोस्टेज खर्च रु. ४०/- (एकूण रु.१६०/-रुपये) इतकी रक्कम मोबाइल क्र.९८५००६२००४ यावर फोन पे/गुगल पे द्वारे पाठविल्यास वाचकांना हे पुस्तक आता घरपोच मागविता येईल. एकूण रुपये १६०/- पाठविल्यानंतर त्याचा स्क्रिन शॅाट व तुमचा पोस्टाचा पत्ता वर दिलेल्या मोबाईल क्रमांकावर व्हॅाटसअॅपव्दारे पाठवून द्यावा.