नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मुलीसह नातवंडाना डॉक्टर जावयाने अमेरिकेत डांबून ठेवल्याचा आरोप शहरातील एका महिलेने केला आहे. परदेशात घर घेवून द्यावे या मागणीसाठी हा कट कारस्थान करण्यात आल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. या सर्व गोष्टीला सासरची मंडळी चितावणी देत असल्याने जावयाकडून छळ सुरू असल्याचे तक्रारीत नमुद करण्यात आले असून याप्रकरणी मुंबईनाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉ.साईप्रसाद झेमसे,मधूकर झेमसे,माधूरी झेमरे,अमोल पवार,सोनाली पवार अशी संशयितांची नावे आहेत. शहरातील महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार तिच्या मुलीचा विवाह घोडबंगररोड भागात राहणा-या डॉ. साईप्रसाद झेमसे यांच्याशी झाला आहे. २०१५ मध्ये संशयित जावयाने मुलीसह नातवंडाना अमेरिकेत नेले. यानंतर मुलीच्या सासरच्या मंडळी कडून जावयास परदेशात घर घेवून द्यावे अशी मागणी करण्यात आली. मात्र मुलीच्या सासरच्या मंडळीची मागणी पूर्ण करू न शकल्याने त्यांच्या चितावणीवरून जावयाकडून छळ सुरू असून त्याने मुलीसह नातवंडाना विदेशात डांबून ठेवल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. मुलीचे स्त्रीधन काढून घेत संशयित जावयाकडून मानसिक व शारिरीक छळ केला जात असल्याने तिच्या जीवितास धोका निर्माण झाल्याचे म्हटले आहे. अधिक तपास उपनिरीक्षक संदिप पाटील करीत आहेत.