नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – टाकळीरोडवरील तपोवन चौक भागात भरधाव मालट्रकने धडक दिल्याने पतीसमवेत दुचाकीवर प्रवास करणारी ५६ वर्षीय महिला ठार झाल्याची घटना घडली. लता शशिकांत गांगुर्डे (५६ रा.चरणदास मार्केट समोर दसक,जेलरोड) असे मृत महिलेचे नाव आहे. या अपघातात लता गांगुर्डे यांचे पती आणि नात जखमी झाले आहे.
गांगुर्डे दांम्पत्य गुरूवारी सायंकाळच्या सुमारास लहानग्या नातीस सोबत घेवून अॅक्टीव्हा दुचाकीने आपल्या घराकडे जात असतांना हा अपघात झाला. विजय ममता सिग्नलवरून टाकळीरोडने जनता विद्यालयाच्या दिशेने गांगुर्डे दांम्पत्य प्रवास करीत असतांना तपोवन चौका नजीक पाठीमागून भरधाव आलेल्या मालट्रकने एमएच १५ एजी ८२१० दुचाकीस धडक दिली. या अपघातात गांगुर्डे दांम्पत्यासह नात जखमी झाली होती. दिर भावराव गांगुर्डे यांनी गंभीर असलेल्या लता गांगुर्डे यांना तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता डॉ.राम पाटील यांनी त्यांना मृत घोषीत केले. याप्रकरणी जखमी शशिकांत गांगर्डे यांच्या जबाबावरून ट्रक चालक दिलीप वाघ (रा.पेठरोड) याच्याविरूध्द उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास उपनिरीक्षक पी.डी.चौधरी करीत आहेत.